आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचेसाठी नैसर्गिक वॉटर थेरपी लाभदायक 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर दिसण्यासाठी तरुणी, महिला चेहऱ्यावर विविध स्वरूपाच्या थेरपी करतात. लोशन, क्रीम, पावडरचा थर जमा होतो. मात्र, त्याचे 'साइड इफेक्ट' होण्याची शक्यता असते. मात्र, अलीकडे महिला वॉटर थेरपीच्या अनेक पद्धतींचा अवलंब करत आहेत. यामुळे त्वचा उजळते आणि फ्रेश राहते. उन्हाळ्यात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही प्रयोग केल्यामुळे चेहरा खराब होतो, तर काहींना उन्हाचा त्रास होत असतो. विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरल्यामुळेही त्यांना त्रास होतो. यात खासकरून त्वचा टॅनिंग म्हणजे काळवंडणे आणि डिहायड्रेशनची समस्या असते. म्हणूनच वॉटर थेरपी नैसर्गिक आणि जास्त उपयुक्तही आहे. 


हायड्रो थेरपी : या थेरपीमुळे फक्त स्नायूच बळकट होत नाहीत, तर त्वचादेखील चांगली होते. त्याचबरोबर फुप्फुसे आणि हृदयसुद्धा निरोगी राहते. तणावाच्या वेळी शरीरातील ठोके वाढतात. यामुळे रोज मात्रांमध्ये एक ग्लास पाणी प्यायल्यास शरीरातील एनर्जीची पातळी वाढून त्वचा फ्रेश दिसते. 


हायड्रो स्टॅटिक इफेक्ट : पाण्यात व्यायाम करणे फार उपयुक्त असते. यामुळे तणाव नाहीसा होतो. शरीरातील तापमान वाढते आणि त्यामुळे जास्त घाम येत नाही. याव्यतिरिक्त पाण्यातील हायड्रो स्टॅटिक इफेक्टमुळे मसाज केल्यासारखे वाटते. 
 

इतर काही उपाय
मॉडर्न डिटॉक्सिफिकेशन
: त्वचा ग्लो करते. सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि त्वचा पण ग्लो करते. अतिरिक्त ऑइल पण स्वच्छ होऊन जाते. 


सुपर हायड्रेटर : कोरड्या त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी या दिवसांत सुपर हायड्रेटचा वापर केला जात आहे. पाण्याने चेहऱ्यावर दबाव टाकून त्वचेला पाणी देण्यात येते. तीन ते चार सेटिंगने त्वचा सॉफ्ट होते. 


अॅक्वा रेडियन : वाढत्या वयात तणावाला दूर ठेवण्यासाठी अॅक्वा रेडियन आवश्यक आहे. जेट स्प्रेच्या साहाय्याने सुपर हायस्पीडपासून हिचा उपयोग केला जातो. ही एक तासाची प्रोसेस असते. तिला महिला जास्त घेणे पसंत करतात. 


स्टिम सोना बाथ : अनेकदा तणावामुळे अस्वस्थता वाटते. यापासून वाचण्यासाठी हॉट शॉवर आणि सोनामध्ये चांगली बाथ घेऊ शकता. याच्या मदतीने तणाव दूर होतो आणि कोणत्याही प्रकारच्या दुखण्यापासून आराम मिळतो. 


ज्यूस पिऊन करा वजन कमी : फिटनेस राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. शरीराचा बेढबपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करतात. घाम गाळून जिममध्ये कसरत करतात. मात्र, औषधांचे सेवन करण्यापेक्षा जिमसोबत नैसर्गिक ज्यूसचे सेवन केल्यास वजन कमी होते. 


नारळ-पाणी : यामध्ये इतर फळांच्या तुलनेने जास्त इलेक्ट्रोलाइट्स असतात. ना यामध्ये अतिरिक्त शुगरची मात्रा असते ना कोणतेही कृत्रिम फ्लेवर मिसळले जातात. यामध्ये अजिबात कॅलरी नसल्याने जाडी वाढत नाही. याव्यतिरिक्त हे शरीरात लगेच स्फूर्ती आणते. 


संत्र्याचा रस : हे वजन कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट ज्यूस आहे. कारण या रसात व्हिटॅमिन 'सी'चा समावेश असतो. ते शरीरासाठी चांगले असतेच, शिवाय चरबीदेखील कमी करते. 


अॅपल व्हिनेगर : हे चवीला फारसे चांगले नसते, पण वजन कमी करण्यासाठी खूपच लाभदायक आहे. तब्येतदेखील चांगली करते. खरे तर अॅपल व्हिनेगर ज्यूस दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायला हवे. एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळून प्यायल्याने वजन कमी होते. 


व्हेजिटेबल ज्यूस : ताज्या भाज्यांचे रस शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. यामुळे शरीराला गरजेची असणारी सगळी पोषक तत्त्वे सोप्या पद्धतीने मिळतात आणि वजनही कमी होते. व्हेजिटेबल ज्यूसमध्ये तंतू अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. याचा खास गुण म्हणजे तुम्ही जेवणाच्या २० मिनिटे आधी हे ज्यूस प्यायल्यास तुम्हाला कमी जेवणातच पूर्ण पोट भरल्यासारखे वाटेल. म्हणजेच कमी प्रमाणात तुम्ही जेवण कराल. 


ग्रीन टी : ग्रीन टी प्यायल्यास ३५-४३ फॅट कमी करू शकतात. वजन कमी करण्यासाठी दिवसातून ३ ते ५ कप ग्रीन टी प्यायला हवे. ग्रीन टीमध्य फक्त गरम पाण्यात मिसळून टी बॅग टाकून पिण्यात येते. 
ऐश्वर्या राजानी 


वॉटर - अॅलोवेरा थेरपी : त्वचा ग्लो करण्यासाठी पाणी आणि कोरफडीला मिसळून मसाज करावी. यानंतर गॅल्वेनिक मशीनने दोन मिनिटांपर्यंत मसाज करावी. यामुळे त्वचा लवचिक आणि मुलायम होते. 

बातम्या आणखी आहेत...