आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी (९३) यांचे साेमवारी मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे पट्टशिष्य म्हणून नाडकर्णींची अाेळख हाेती. शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौंतेय, एक शून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिंकलो मी हरलो, वर्तुळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्वीपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ही त्यांची प्रमुख नाटके गाजली.  


नाडकर्णी यांनी नानासाहेबांसाेबत हॅम्लेट आणि इतर व्यावसायिक नाटकांत भूमिका केल्या.  प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या रंगायन या नाट्यसंस्थेच्या प्रत्येक नाट्य कलाकृतीत नाडकर्णी यांचा प्रामुख्याने सहभाग होता.  अरुण काकडे, माधव वाटवे, विमल जोशी, लालन सारंग, कमलाकर सारंग, कमलाकर नाडकर्णी, दामू केंकरे, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे, कुमुद चास्कर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, उषा नाडकर्णी, स्नेहलता प्रधान अादी ज्येष्ठ कलाकारांसाेबत त्यांनी काम केले. मुंबई महानगरपालिकेतून १९८४ या वर्षी निवृत्त होईपर्यंत त्यांना खात्यांतर्गत, आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत सर्वाेत्कृष्ट अभिनयाचे, दिग्दर्शनाचे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. दरम्यान, त्यांच्या निधानाचे वृत्त समताच मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.

बातम्या आणखी आहेत...