आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TV Show Kkusum Actress Nausheen Ali Sardar In Relationship With A US Based Businessman Meet In Diwali Party

US बेस्ड बिझनेसमनला डेट करतेय टीव्हीची कुसुम, एका दिवाळी पार्टीमध्ये झाली भेट, एकेकाळी बॉयफ्रेंडने लग्नाचा विषय निघाल्यावर सोडले होते 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. एकता कपूरचा प्रसिध्द टीव्ही शो 'कुसुम'मधून प्रसिध्द झाली अभिनेत्री नौशीन अली सरदार सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. नौशीन यूएस बेस्ड बिझनेसमन एलेक्सजेंडर नाथनला डेट करतेय असे वृत्त आहेत. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दिवाळी पार्टीत झाली होती. येथेच दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एलेक्सजेंडर एक बिझनेसमन आहे, तो गरीबांसाठी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करतोय. याच कामांसाठी तो भारतात येत जात राहतो. नौशीन दिर्घकाळ 'हातिम' फेम टीव्ही अॅक्टर राहिल आजमसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली आहे. नौशीनला लग्न करायचे होते, पण राहिल यासाठी तयार नव्हता. अशा वेळी दिर्घ रिलेशनशिपनंतर हे कपल वेगळे झाले होते. 

 

2003 मध्ये अॅक्सीडेंटनंतर करावी लागली सर्जरी 
- ऑनस्क्रीन नौशनचे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहिल्यानंतर अनेक वृत्त आले की, नौशनने सर्जरी केली. पण नौशनने स्वतः खुलासा केला की, तिने सर्जरी केली आहे, पण ही कोणतीही कॉस्मेटिक सर्जरी नाही. 
- नौशीनने सांगितल्यानुसार, 2003 मध्ये तिचा अॅक्सीडेंट झाला होता. अॅक्सीडेंटमुळे तिच्या स्कल आणि कॉलर बोनमध्ये फ्रॅक्चर झाले होते. यासोबतच तिच्या नाकालाही ईजा झाली होती. यामुळे नौशीनला श्वास घेण्यात अडचण येत होती. 
- यामुळेच नौशनने सर्जरी केली आणि तिच्या लूकमध्ये बदल झाला. 2001 ते 2005 च्या काळात तिने कुसुमची भूमिका साकारली. नौशनने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले तेव्हा ती अवघ्या 18 वर्षांची होती. 

बातम्या आणखी आहेत...