आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात तेजसची नाैदलासाठी प्रथमच यशस्वी अरेस्ट लँडिंग, जगात 5 देशांकडेच तंत्रज्ञान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस लवकरच आयएनएस विक्रमादित्य आणि विक्रंातसारख्या युद्धनौकांवरून उड्डाण घेताना दिसणार आहे. यासाठी भारतीय बनावटीचे लढाऊ विमान तेजसला तयार केले जात आहे. शुक्रवारी गोव्यात तेजसच्या सागरी आवृत्तीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हलके लढाऊ विमान तेजसचे अरेस्ट वायर लँडिंग करण्यात आले. त्याचा व्हिडिआेदेखील जारी करण्यात अाले आहे. गोव्यामध्ये ही चाचणी संरक्षण विभाग, डीआरडीओ आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट संस्थांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच तेजस डिझाइन करण्यात आले आहे.

कमी जागेत लँडिंग मोठे आव्हान
युद्नौधकेवरील धावपट्टी खूप लहान आहे. एवढ्या जागेत लढाऊ विमान उतरवावे लागते. अशा परिस्थितीत अरेस्ट वायर टेक्नोलॉजी उपयोगी पडते. विमानाच्या मागे एक हूकसारखा लँडिंग गिअर असतो. तेथेच युद्धनौकेवर एक बळकट वायर असते. लँडिंगच्या वेळी पालयट वायरमध्ये गिअर अडकवून विमान थांबवू शकतो. परंतु वेगावर नियंत्रण आव्हान असते.

पाच देशांकडे हे तंत्रज्ञान
आतापर्यंत मोजक्याच देशांनी िवमान 'अरेस्ट लँडिंग' केले आहे. यात अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांचा समावेश आहे. गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर पार पडलेल्या चाचणीमध्ये तेजस अरेस्ट लँडिंग करू शकतो हे सिद्ध झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...