आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाईक व गावित परिवाराचे सदस्य एकत्र आल्याने अनेक चर्चेला उधान

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवापूर - नवापूर राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू नसतो. तसेच कोणीच कोणाचा मित्र नसतो. या वाक्यचा प्रत्यय नवापूर मधील गावीत कुटुंब व नाईक कुटुंब वयांच्यातील घनिष्ठ मैत्री व भरत गावीत यांच्या नाराजीमुळे विधानसभा निवडणुकीत भरत गावीत यांनी भाजप प्रवेश करून शिरिषकुमार सुरुपसिंग नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यावेळी नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका नगराध्यक्षा, नगरसेवक, सरपंच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची गोची झाली होती. नाईक परिवाराचा प्रचार व प्रसार करायचा कि गावित परिवाराचा अशी द्विधा मनस्थितीत कार्यकर्त्यांना मध्ये होती. अचानक भरत गावीत यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अनेकांचे एकमेकांशी वाद विवाद झाले, इकडून फिरलो तर तिकडे राग अशी स्थिती होती. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्याचा वेळी नाईक व गावित परिवाराची सदस्य एकत्र दिसल्याने अनेकांना सुखद धक्का बसला. राजकीय अस्तित्वासाठी परत एकदा दोघे दिग्गज कुटुंबातील राजकीय वारसदार जिल्हा परिषदच्या निवडणुकीत ऐन तोंडावर एकत्रितपणे दिसून आले.त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी लावण्या पेक्षा डोक्याचा वापर करून राजकारण करावे. दोन दिवसांचे राजकारण समजून पुन्हा समाजासाठी एकत्र राहणे कधीही हिताचे राहते अशी शिकवण या राजकीय प्रसंगातून शिकवण मिळते.