आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
निलेश पाटील
नवापूर- महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात दुचाकींची चोरी करुन बनावट कागदपत्रांसह दुचाकींवर बोगस क्रमांक टाकून विक्री करणाऱ्या सराईत टोळीचा नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार संशयित आरोपीना अटक करुन त्यांच्या ताब्यातून चार लाख रुपये किंमतीच्या 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातून तब्बल 20 वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वैभव दिलीप परदेशी रा.खांडबारा, जफर सलीम पठाण रा.खांडबारा, जवानसिंग नाईक, रा.खैरवे, सुभाष किसन वळवी, रा.निझर, जि.तापी (गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातून दुचाकींची चोरी करुन बनावट आरसी बुक तयार करुन दुचाकींची कमी किंमतीत विक्री करणारी टोळी सीमावर्ती भागात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व पोलीस हवालदार दादाभाई वाघ यांना मिळाली.त्यानुसार नवापूर पोलीसांनी वेगवेगळ्या दोन टीम तयार केल्या. सापळा रचून नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील वैभव दिलीप परदेशी, याचाकडून पोलीस दादाभाई वाघ सहकारी यांनी बनावट ग्राहक बनवून चिंचपाडा गावात चोरीस गेलेली मोटार सायकल हस्तगत केली. पोलीसांनी कागदपत्रांची मागणी केली असता, चोरट्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली.अधिक चौकशीत त्याला ताब्यात घेतले असता.तीन साथीदाराचे नाव समोर आले.
सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी, धिरज महाजन, जयेश बावीस्कर, योगेश साळवे, योगेश्वर तनपुरे, दिनेश बावीस्कर, आदिनाथ गोसावी यांच्या दोन टिम तयार करुन त्याच्यातुन स्वत: गाडी विकत घ्यायची आहे असे ग्राहक बनुन त्यांना चिंचपाडा येथे बोलाविले. तो तेथे ठरल्या व्यवहाराप्रमाणे गाडी घेवुन येताच पोलीसांनी त्याला तेथे पकडले. त्यानंतर सखोल चौकशी केली असता.जफर सलीम पठाण दोन्ही रा. खांडबारा याचे नाव सांगितले. त्याला तात्काळ खांडबारा येथे जावुन पकडले व दोघांकडुन 8 गाड्या ताब्यात घेतल्या. पोलीस कस्टडी रिमांड घेवुन अधिक माहीती घेतली असता आरोपींनी अजुन दोन आरोपींचे नाव सांगितले जवानसिंग नाईक, रा. खैरवे व सुभाष किसन वळवी, रा. निझर, जि. तापी (गुजरात) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी दोघांनी मिळुन 12 मोटार सायकली काढुन दिल्या. चौघे आरोपीकडुन चार लाख रु. किंमच्या एकुण 20 मोटार सायकली हस्तगत करण्यात आले.सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्या पथकाने केली आहे.
दादाभाईची गुन्हेगारावर दबंग कारवाई
नवापूर पोलिस ठाण्यातील बीट पोलीस कर्मचारी दादाभाई वाघ यांच्या पाच महिन्याच्या कारकिर्दीत आठ मोटरसायकली चोरी,दोन घरफोडी, बॅग लिफ्टिंग, 20 मोटरसायकली चोरी अश्याप्रकारे गुन्हे उघडीस आणल्याने नंदुरबार पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत व पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दबंग कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.
गुजरात पोलीस चोरट्यांचा समाचार घेणार ?
शेजारील गुजरात राज्यातील मोठ्या प्रमाणात मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत. या चोरीचे तपास करण्यासाठी खांडबाराच्या मोटरसायकली चोरी करणारे टोळीला गुजरात राज्यात देखील 'पाहुणचार' होऊ शकतो. आंतरराज्य मोटरसायकल चोरी करणारी टोळी असल्याने गुजरात पोलिसांचा डोळा आहे.अशी चर्चा व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.