आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​नवापूर-पुणे बसला पावडदेव फाट्यावर भीषण अपघात.. चालक-वाहकासह 18 प्रवाशी जखमी, 7 गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर/नवापूर- पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील अपघाताची मालिका नित्याने सुरूच असून
 पावडदेव मंदिर शिवारातील वळणावर शनिवारी सकाळी साडे दहा वाजता एसटी बस आणि दोन ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 18 प्रवाशी जखमी झाले. यातील 8 गंभीर प्रवाशांना धुळे येथे पाठविण्यात आले.

 

नावपूरहून पुणेकडे येणारी नवापूर-पुणे बस (MH 20 BL 1600) जात असतांना पावडदेव फाट्यावरील वळणावर नाशिककडून येणाऱ्या ट्रकने (TN 88 A 4549) जोरदार धडक दिली. अपघात इतका भयानक होता की तिघेही वाहने एकमेकांना धडकली गेल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 

सुरवातीला एसटीच्या पुढील भागाला एका ट्रकने टक्कर दिली तर (TN 36 AU 1590) या दुसऱ्या ट्रकने मागील भागाला धडक दिली. त्यामुळे एसटी बसमधील चालक-वाहकासह 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. बसचालक लक्ष्मण कोकणी व वाहक कांतीलाल बहिरम यांच्या पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली असून वाहक अपघातात खिडकीच्या बाहेर फेकले गेले. अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी 3 वर्षाची बालिका या बसने प्रवास करीत होती. तिच्या डोक्याला मुक्का मार लागला व डोळेही थोडक्यात बचावले. यावेळी तिच्या हातावर इतर प्रवाशांच्या अंगावरील रक्ताचे डाग पडले होते. बससह दोघा ट्रकांची अवस्था अतिशय भयानक झाली आहे. एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर एसटी नावपूरहून पुणे कडे जात होती.


अपघाताची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी व एसटी प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांना 3 रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात दाखल करून गंभीर जखमींना डॉ.राकेश मोहने यांनी प्राथमिक उपचार करून धुळे येथे पाठविले. यावेळी बघणाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

दरम्यान याच मार्गावर शेलबारी घाट, देशशिरवाडे, वन तपासणी नाका या शिवारात महिनाभरात अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. आजच्या अपघातातही अनेक प्रवाशांच्या डोक्याला, हाता-पायाला, दाताला, पायाला, कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे.

 

बसमधील जखमी प्रवाशी

तुकाराम काळु माळचे (वय 66) रा.खरडबारी, शेख नासिर (वय 34) रा. अहमदाबाद, उठल्या ठग्या गावित (वय 76) रा.कारेघाट, सुरजीतसिंग महेंद्रसिंग (वय40) रा.सुरत, शिवदास अंबर गवळी (52) रा.बाभुळदे, सुकाम कडु सोनवणे (वय45) रा.नागझीरी, शिवदास रेवजु भोये (वय50) रा.खरडबारी, राणी शिवदास भोये (वय 45) रा. खरडबारी, अश्फाक बशिर तांबोळी (वय34) रा. पिंपळनेर, दिगंबर जयराम पवार (वय 67) रा.शेणपुर, विजय डी.निकम (वय 59) रा.नवापुर, कांतीलाल एस.बहिरम (वाहक) (वय 33) रा.नवापुर, लक्ष्मण एस.कोकणी (चालक) (वय 51) रा.नवापुर, रशिद हसन खाटीक (वय 74) रा.नंदुरबार, अजय व्ही डिवटे (वय 40) रा.नवापुर, अनिल यशवंत परीकर (वय 30) पिंपळनेर, प्रतिभा देविदास पवार (वय 3) रा जायखेडा, परेश देविदास पवार (26) रा जायखेडा.

 

गतिरोधक बसविण्यात यावे..
पिंपळनेर-सटाणा रस्ता अपघाताचे क्षेत्र बनले आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. या भागात ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अशी  मागणी नागरिकांनी केली आहे.

 

एसटीने वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक:-
शेलबारी घाटासह पावडदेव फाट्यावर बहुतांश अपघात एसटी व ट्रक,डंपर यांच्यात झाले आहेत.त्यात एसटी चालकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघात कमी होण्यास मदत होईल अशी माहिती प्रवाशांनी दिली.


एसटीला आहे स्पीड लिमिटिंग डिव्हाईस..
वारंवार घडणाऱ्या अपघाताबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की एसटी बस 55 ते 60 किमी वेगाने धावते व प्रत्येक एसटीला स्पीड लिमिटिंग डिव्हाईस बसविले असल्याने वेग वाढूच शकत नाही शिवाय त्यात बदल केल्यास बस सुरूच होत नाही त्याची दर महिन्याला तपासणीही केली जाते.


- पंकज देवरे,डेपो मॅनेजर, साक्री आगार)

 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा भीषण बस अपघाताचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...