आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र 2018 : यावेळी नावेमध्ये बसून येणार देवी आणि मनुष्यावर स्वार होऊन जाणार, दोन्ही वाहनांचे मिळणार शुभ फळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी 10 ऑक्टोबर, बुधवारपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे. देवी दुर्गाचे वाहन सिंह आहे परंतु प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये देवी वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊन पृथ्वीवर येते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवीचे वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊन येण्याचा प्रभावही वेगवेगळा सांगण्यात आला आहे.


देवी भागवतनुसार 
शशिसूर्ये गजारूढ़ा शनिभौमे तुरंगमे। 
गुरौ शुक्रे चदोलायां बुधे नौका प्रकी‌र्त्तिता


अर्थ - सोमवार आणि रविवारी प्रथम पूजा म्हणजे कलश स्थापना असल्यास देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते. शनिवार आणि मंगळवारी नवरात्र सुरु होत असल्यास देवीचे वाहन घोडा असतो. गुरुवार किंवा शुक्रवारी नवरात्र सुरु असल्यास देवी डोलीमध्ये बसून येते. बुधवारपासून नवरात्र सुरु झाल्यास देवी नावेमध्ये स्वार होऊन येते.


देवीचे वाहन आणि त्यामुळे पडणारा प्रभाव 
देवी दुर्गा ज्या वाहनाने पृथ्वीवर येते त्यानुसार, वर्षभरात होणाऱ्या घटनांचे आकलन केले जाते.
तत्तफलम: गजे च जलदा देवी क्षत्र भंग स्तुरंगमे। 
नोकायां सर्वसिद्धि स्या ढोलायां मरणंधुवम्।। 


अर्थ - देवी हत्तीवर स्वार होऊन आल्या पाऊस जास्त पडतो. घोड्यावर बसून आल्यास शेजारी देशांशी युद्धाची शक्यता वाढते. देवी नावेमध्ये बसून आल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात आणि डोलीमध्ये बसून आल्यास महामारीची भीती राहते.


पुढील स्लाईड्सवर वाचाकोणत्या दिवशी कोणत्या वाहनावर स्वार होऊन जाते देवी...

बातम्या आणखी आहेत...