आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी का केली जाते देवी कात्यायनीची पूजा? हा आहे पूजन विधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रीच्या सहाव्या दिवसाची (15 ऑक्टोबर) प्रमुख देवी कात्यायनी आहे. महर्षी कात्यायन ऋषींच्या घरी कन्येच्या रूपाने जन्म घेतल्याने कात्यायनी म्हणतात. देवीने आश्विन शुक्ल दशमीला महिषासुराचा वध केला. या देवीच्या उपासनेचे फळ धर्म, अर्थ, काम, मोक्ष सहज व सुलभ मिळवता येते.


पूजन विधी -
सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर कात्यायनी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. चौरंगावर चांदी, तांबे किंवा मातीचा कलश स्थापन करून त्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवा. त्यानंतर चौरंगावर श्रीगणेश, वरुण, नवग्रह, षोडश मातृका (16 देवी) ची स्थापना करावी. त्यानंतर व्रत, पूजांचा संकल्प घ्यावा.


वैदिक आणि सप्तशती मंत्राचा उच्चार करून कात्यायनीसहित सर्व स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा करावी. यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य सूत्र, चंदन, रांगोळी, हळद, शेंदूर, दुर्वा, बिल्वपत्र, दागिने, फुलं-हार, सुगंधित द्रव्य, धूप-दीप, नैवेद्य, फळ, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजलि इ. गोष्टी कराव्यात.


ध्यान मंत्र
चन्द्रहासोज्जवलकरा शार्दूलावरवाहना।
कात्यायनी शुभं दद्यादेवी दानवद्यातिनी।।

बातम्या आणखी आहेत...