आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी कालरात्रीची पूजा नवरात्रीमध्ये सातव्या दिवशीच का केली जाते?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवसाची प्रमुख देवी कालरात्री आहे. कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधार्‍या रात्रीप्रमाणे काळा, डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. या चतुर्भुज देवीचे वाहन गाढव. उजव्या एका हाताची अभय व दुसर्‍याची वरमुद्रा आहे. एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसर्‍या हातात तलवार आहे. उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणार्‍या या देवीला शुभंकरी म्हणतात.


पूजन विधी -
सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर कालरात्री देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. चौरंगावर चांदी, तांबे किंवा मातीचा कलश स्थापन करून त्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवा. त्यानंतर चौरंगावर श्रीगणेश, वरुण, नवग्रह, षोडश मातृका (16 देवी) ची स्थापना करावी. त्यानंतर व्रत, पूजांचा संकल्प घ्यावा.


वैदिक आणि सप्तशती मंत्राचा उच्चार करून कात्यायनीसहित सर्व स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा करावी. यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य सूत्र, चंदन, रांगोळी, हळद, शेंदूर, दुर्वा, बिल्वपत्र, दागिने, फुलं-हार, सुगंधित द्रव्य, धूप-दीप, नैवेद्य, फळ, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजलि इ. गोष्टी कराव्यात.


ध्यान मंत्र
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी॥
वामपादोल्लसल्लोहलताकण्टक भूषणा।
वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी॥

बातम्या आणखी आहेत...