Cricket / नवदीपचे विक्रमी पदार्पण; २० व्या षटकात धावा न देणारा पहिला भारतीय गाेलंदाज

टीम इंडियाची १-० ने अाघाडी; अाज मालिका विजयाची संधी

वृत्तसंस्था

Aug 04,2019 09:16:00 AM IST

फ्लोरिडा - कर्णधार विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. भारतीय संघाने शनिवारी तीन सामन्यांच्या मालिकेत शानदार विजयी सलामी दिली. भारताच्या संघाने पहिल्याच सामन्यात ४ गड्यांनी विजय संपादन केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली. आता टीम इंडियाला मालिका विजयाची संधी आहे. भारताकडून पदार्पणात नवदीप सैनीने विक्रमाला गवसणी घातली. ताे २० व्या षटकांत एकही धावा न देणारा पहिला भारतीय गाेलंदाज ठरला आहे.


भारत आणि विंडीज यांच्यातील मालिकेचा दुसरा टी-२० सामना आज रविवारी याच मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघ विजयाचा कित्ता गिरवण्यासाठी सज्ज आहे. विंडीजला या मैदानावर आता पुनरागमन करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.


विंडीजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ९५ धावा काढल्या. भारताने आवाक्यातले विजयाचे लक्ष्य १७.२ षटकांत सहा गड्यांच्या माेबदल्यात सहज गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचीही निराशाजनक सुरुवात झाली. मात्र, राेहित (२४), काेहली (१९), मनीष पांडे (१९) आणि रवींद्र जडेजाज (नाबाद १०) यांनी झंुज देत विजयश्री खेचून आणली.

पहिल्याच सामन्यात १५ विकेट ; नवदीपचे सर्वाधिक ३ बळी
फ्लाेरिडा येथील मैदानावर गाेलंदाजांना शानदार खेळी करता आली. त्यामुळेच सामन्यात एकूण १५ विकेट पडल्या. यात विंडीज संघाच्या नऊ आणि भारताच्या पाच विकेटचा समावेश आहे. भारताकडून नवदीप सैनीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तसेच भुवनेश्वर कुमारने २ गडी बाद केले.त्यापाठाेपाठ वाॅशिंग्टन सुंदर,खलील अहमद, कृणाल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली. विंडीजकडून काॅट्रेल, किमाे पाॅल आणि सुनील नरेनने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.

यंदा सत्रात दाेन गाेलंदाजांचा पराक्रम
पदार्पणात २० व्या षटकांत एकही धाव न देण्याचा पराक्रम यंदा दाेन गाेलंदाजांनी केला. यात नवदीप आणि सिंगापूरच्या प्रकाशचा समावेश आहे.

X
COMMENT