आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Navjyot Sing Siddhu Resigns As Minister In Punjab Cabinet, Reveals Letter To Rahul Gandhi

नवज्योत सिंग सिद्धूंचा मंत्रिपदावरून राजीनामा; राहुल गांधींना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर केले शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी रविवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. त्याच वादावरून त्यांनी राहुल गांधी यांना गेल्या महिन्यात एक पत्र देखील सोपविले होते. ते पत्र देखील सिद्धूंनी रविवारी सोशल मीडियावर सार्वजनिक केले आहे. 10 जून रोजीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सिद्धूंनी हे पत्र दिले होते. विशेष म्हणजे, क्रिकेटर ते नेते बनलेले सिद्धू यांनी 2017 मध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

 

 


पंजाब कॅबिनेटने जून महिन्यात एक महत्वाची बैठक घेतली होती. परंतु, सिद्धूंनी त्या बैठकीला दांडी मारली. यानंतर नाराज झालेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंचे खाते बदलले. त्यांच्याकडून स्थानिक शासन विभाग घेऊन वीज आणि नवीनिकरण ऊर्जा विभागाचे मंत्रिपद देण्यात आले. सिद्धूंनी मात्र नवीन मंत्रालय मिळाल्यानंतरही त्याची सूत्रे हातात घेतलीच नाहीत. एवढेच नव्हे, तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह राहुल गांधींसमोर आपला आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची तक्रार केली होती.


पत्नीला उमेदवारी नकारल्यानंतर सुरू झाला होता वाद
नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सिद्धूंच्या पत्नी नवज्योत कौर यांना उमेदवारी नकारण्यात आली होती. त्यावरून सिद्धूंच्या पत्नीने अमरिंदर सिंग यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. अमरिंदर सिंग यांच्यामुळेच आपल्याला तिकीट मिळाले नाही असा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी पत्नीच्या आरोपांचे सिद्धूंनी जोरदार समर्थन केले होते. अमरिंदर सिंग यांनी आरोप स्पष्टपणे फेटाळले. तरीही पती-पत्नी मुख्यमंत्र्यांवर नाराजच होत्या. या दरम्यान कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारून सिद्धूंनी आपला निषेध व्यक्त केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर करणे सोडून सिद्धूंचे खातेच बदलले. तेव्हापासून हा वाद आणखी चिघळला. तत्पूर्वी सिद्धूंनी पाकिस्तानात एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावून तेथील लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली होती. सोशल मीडियावर विरोधकांकडून ट्रोल झाल्यानंतर सिद्धूंचा मुख्यमंत्र्यांनी देखील विरोध केला होता.