Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Navnath Izharwade arrested for cheating with police inspector

पोलिस निरीक्षकाला फसवणाऱ्या नवनाथ इसारवाडे याला अटक; सहा लाख रुपयांना घातला होता गंडा

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 11:07 AM IST

पोलिस निरीक्षकाला फसवणारा शिवसंग्रामचा तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी रात्री

  • Navnath Izharwade arrested for cheating with police inspector

    शेवगाव- पोलिस निरीक्षकाला फसवणारा शिवसंग्रामचा तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी रात्री त्याच्या राहत्या घरातून जेरबंद केले. मागील आठवड्यात त्याच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात तब्बल चार गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार विनायक मेटे यांचा बनावट आवाज काढून पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना त्याने सुमारे सहा लाख २० हजार रुपयांना गंडा घातला होता.


    चापडगाव येथील राधाबाई दादासाहेब गोर्डे या महिलेची जमीनविक्री व्यवहारात १५ लाख रुपयांची फसवणूक व धमकावल्याप्रकरणी इसारवाडे याच्याविरुध्द शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुरुवारी रात्री गदेवाडी येथील राहत्या घरात इसारवाडे याला अटक केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, नाणेकर, रवींद्र कर्डिले आदींचा समावेश होता. न्यायालयात हजर केले असता इसारवाडे याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अश्विन आलेवार यांनी ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.


    ओमासे व इसारवाडे यांच्यात खलबते
    इसारवाडे याच्या पत्नीने पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप केला असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे. इसारवाडे यास न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता पोलिस निरीक्षक ओमासे व इसारवाडे हे एका खोलीत बसून खलबते करत असताना आढळले. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Trending