आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरडला जाणारा मध्यमवर्ग आणि हसणारी सरकारे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, डीबी डिजिटल - Divya Marathi
नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, डीबी डिजिटल

नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, डीबी डिजिटल


कोलकत्यात हुगळी नदीच्या अस्वच्छ किनारी काही कसाई बसलेले असतात. पाण्यापासून काही अंतरावर त्यांनी एक मोठं कासव पाळलेलं असतं. हे कासव खुरडत गुडघ्याइतक्या पाण्यापर्यंतच जावू शकते, कारण त्यापुढे त्यांनी फेकलेले जाळे असते. ग्राहक आला की कासवाला उलटवलं जातं आणि हवे तेवढे मांस कापून तराजतू तोलण्यात येतं. कासवाची पाठ इतकी मजबूत, जिद्दी अन् कडके की बंदुकीची गोळीही तिला धडकून परत जाईल! पण, तेच कासव आपला सर्वांत मऊ भाग कापला जाताना, तराजूत तोलला जाताना पाहात राहतो.      

आज देशातील मध्यमवर्गाची अवस्था अशीच आहे. नोकऱ्यांमध्ये स्थैर्य नाही. बाजार थंडावला आहे, खर्च वाढत चाललाय आणि त्यातूनही काही बचत केली, तर त्यापुढे सरकारांनी फेकलेले करांचे जाळे आहेच. सगळ्या सवलती एक तर अत्यंत गरीबांना दिल्या जात आहेत किंवा अतिश्रीमंतांना. मध्यमवर्गाच्या वाट्याला केवळ अंधार आला आहे. घोर अंधाराचं साम्राज्य. ना कुठला शब्द, ना कुठली आकृती. काळाचं भानही लोप पावलंय. भयाण शांततेत एक आवाज आला. कुठला तरी रथ होता; पण तो कुणा धृतराष्ट्राचा नव्हे, तर इतिहासातील होता. एकविसाव्या शतकातील रथ होता. या अंधाराची साक्ष घ्यायला आलेल्या काळाच्या सारथ्याने विचारले- सांग, लेखणीची ताकद कशी आहे? 

उत्तर मिळाले- ही शक्ती रक्ताने माखलेल्या अक्षरांमध्ये बुडाली आहे. त्यानंतर मनाची पाने शब्दा-शब्दांनी उलगडत गेली... आणि इतिहास मान झुकवून एेकत राहिला. त्याने केवळ एकदा डोके वरती केले- मध्यमवर्गाचे हाल पाहिले, पैसेवाल्यांची मौजमजा पाहिली आणि तो आध्यात्मिक अवस्थेत गेला. सांगू लागला- पुराणात, स्मृतींमध्ये प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळ्या सूर्याची कल्पना केली आहे. पण, माणसाचे चिंतन दिव्य असल्याने त्याला तेरावा सूर्य मानता येऊ शकते... पण, खेदाची गोष्ट म्हणजे केंद्र वा राज्य सरकारांना या दिव्य चिंतनाची, या तेराव्या सूर्याची काहीच चिंता नाही. मध्यमवर्गाच्या चिंतेतून सरकारला कुणी प्रश्न विचारला, तर ही सरकारेही आध्यात्मिक अवस्थेत जातात अन्् सांगू लागतात, की चिंता करु नये, ती चितेसमान आहे. मध्यमवर्ग स्वत:च आपलं सगळं बघून घेईल. आम्हाला गठ्ठ्याने मते देणाऱ्या गरीबांची आणि ती मिळवून देणाऱ्या श्रीमंतांची काळजी केली पाहिजे. गरीबांचे भले झाले पाहिजे. पण, मध्यमवर्गाची किंमत मोजून नाही. धनाढ्यांची तिजोरी भलेही भरत राहो, पण केवळ मते खेचण्याच्या नवनव्या योजनांसाठी नाही. असो. सरकार हे सरकारच आहे. त्याच्या हाती ताकद आहे, कपट आणि भविष्यही आहे. ते कुठल्याही पक्षाचे असले, तरी फक्त चेहरे बदलतात. ते असतं एखाद्या गुहा किंवा खंदकासारखं. एखाद्या खोल पाताळ वा मृगजळासारखं.

बातम्या आणखी आहेत...