Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Navneet Rana will stand in Amravati with Rshtrwadi congress

रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष महाआघाडीसोबत, पत्नी नवनीत राणा निवडणूकीच्या रिंगणात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 06:16 PM IST

मागील लोकसभेत आनंदराव अडसूळांकडून पराभूत

  • Navneet Rana will stand in Amravati with Rshtrwadi congress

    अमरावती- अमरावतीचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष आघाडीच्या गोट्यात गेला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात लोकसेभच्या रिंगणात उतरवले आहे.

    मागील लोकसभा निवडणूकीत नवनीत राणा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून लढल्या होत्या, पण त्यांच्या शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पराभव केला होता. तरिदेखील नवनीत राणा यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आणि पाच वर्षांपासून अमरावती जिल्हा पिंजून काढत आहेत.

    मागील पाच वर्षात नवनीत राणा यांनी आपला जनसंपर्क चांगलाच वाढवला आहे. खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी या गोष्टीची दखल घेत त्यांना पाठिंबा दिलाय. मागील निवडणूकीत थोड्या मतांनी नवनीत यांचा पराभव झाला होता. पण सध्या युवा स्वाभिमानी पक्षाचं अमरावतीत पारडं जड झालं आहे. त्यामुळेच युवा स्वाभिमानी पक्षाला पाठिंवा देऊन नवनीत राणा यांना विजयी करावे अशी रवी राणा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विनंती केली आहे.

Trending