आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कोणत्या वयातील मुलीची पूजा केल्याने काय फळ प्राप्त होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्गा देवाच्या भक्तीचा उत्सव नवरात्र सुरु झाला आहे. या दिवसांमध्ये देवीची तसेच लहान मुलींची पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, लहान मुलींच्या मनामाने कोणत्याही प्रकारचे वाईट विचार नसतात, स्वार्थ नसतो यामुळे याना साक्षात देवीचे स्वरूप मानले जाते. शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आले आहे. नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की, महिला पूजनीय असून यांचा नेहमी सन्मान करावा. 

 

1. देवी भागवत महापुराणातील तृतीय स्कंधानुसार 2 वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने गरिबी दूर होते.


2. तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात. म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचे स्वरूप. या मुलीची पूजा केल्याने धर्म, अर्थ आणि काम प्राप्ती होते. वंश पुढे वाढतो.


3. चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते.


4. पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व रोंगाचा नाश होतो.


5. सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो.


6. सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात. या मुलीच्या पूजेने धन, ऐश्वर्य प्राप्त होते. 


7. आठ वर्षाच्या मुलीला शांंभवी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने दुःख दूर होतात.


8. नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने परलोकात सुख मिळते. 


9. दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, किती कुमारिकांचे पूजन केल्यानंतर कोणते फळ प्राप्त होते आणि कुमारिका पूजनाचा विधी...

बातम्या आणखी आहेत...