आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्री : धन, आरोग्य, विवाह, प्रमोशनच्या सर्व समस्या दूर करू शकतात हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्रीचे समापन 18 ऑक्टोबर, गुरुवारी होत आहे. यामुळे आता देवीच्या उपासनेसाठी 7 दिवस शिल्लक आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. धन, नोकरी, स्वास्थ्य, आपत्य, विवाह, प्रमोशन इ. इच्छा या काळामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या उपायांनी ती पूर्ण होऊ शकते.


घरात बरकत राहण्यासाठी
नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर समोर मोती शंख ठेवून त्यावर केशराने स्वस्तिक काढा. त्यानंतर खालील मंत्राचा जप करावा.


श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:


स्फटिकाच्या माळेने जप करावा. मंत्रोच्चारासोबत एक एक तांदूळ या शंखामध्ये टाकावा. हा उपाय सलग नऊ दिवस करावा. नऊ दिवसानंतर तांदूळ टाकलेला शंख एका पांढऱ्या पिशवीत किंवा कपड्यात बांधून तिजोरीत किंवा धन स्थानावर ठेवावा. या उपायने धन वृद्धी होईल.


- धनलाभासाठी उपाय
नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर उत्तर दिशेला मुख करून पिवळ्या आसनावर बसा. समोर तेलाचे नऊ दिवे लावावेत. दिव्यांसमोर लाल तांदळाची (तांदूळ रंगवून घ्या) रास करून त्यावर श्रीयंत्र ठेवा. त्यानंतर श्रीयंत्राची हळद, कुंकू, फुल, अक्षता वाहून पूजा करा. पूजा झाल्यानंतर श्रीयंत्राची देवघरात स्थपना करून इतर सामग्री नदीमध्ये प्रवाहित करा. देवघरात स्थापन केलेल्या श्रीयंत्राची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला अचानक धनलाभाचे योग जुळून येतील.


लवकर लग्न जमण्यासाठी
नवरात्रीमध्ये घरातच किंवा मंदिरात जाऊन शिव-पार्वतीची पूजा केल्यानंतर खालील मंत्राचा 3, 5 किंवा 10 माळ जप करावा. जप झाल्यानंतर महादेवाकडे लग्नात येणाऱ्या बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करावी...


मंत्र
ऊँ शं शंकराय सकल-जन्मार्जित-पाप-विध्वंसनाय,
पुरुषार्थ-चतुष्टय-लाभाय च पतिं मे देहि कुरु कुरु स्वाहा।।


- मनासारखा पती मिळण्यासाठी उपाय
नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी घराजवळील महादेवाच्या मंदिरात जावे. त्यानंतर महादेव आणि देवी पार्वतीला जल आणि दुधाचा अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा लाल चंदनाच्या माळेने जप करावे...


हे गौरी शंकरार्धांगी। यथा त्वं शंकर प्रिया।
तथा मां कुरु कल्याणी, कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।


त्यानंतर तीन महीने दररोज या मंत्राचा महादेवाच्या मंदिरात जावून किंवा घरातच शिव-पार्वतीच्या प्रतिमेसमोर जप करावा.

 

मनासारखी पत्नी मिळण्यासाठी
नवरात्रीमध्ये जो सोमवार येईल त्यादिवशी सकाळी स्नान करून पवित्र झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जावे. मंदिर झाडून स्वच्छ करावे. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर महादेवाची चंदन, फुल, धूप-दीप दाखवून पूजा करावी. रात्री 10 नंतर अग्नी प्रज्वलित करून ऊँ नम: शिवाय मंत्राचा उच्चार करीत शुद्ध तुपाची 108 वेळेस आहुती द्या. त्यानंतर 40 दिवस या मंत्राचा पाच माळ महादेवासमोर जप करा. या उपायाने लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...