आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र : या काळात खाऊ नये लसूण कांदा, कारण यामागे दडले आहे खास कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 10 ऑक्टोबर, बुधवारपासून होत आहे. हिंदू सणवारांमध्ये नवरात्रीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नऊ दिवस दुर्गामातेची पूजा व उपवास या पद्धतीने हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. नवरात्रातील उपवास हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग. हे उपवास म्हणजे शरीर, मन व आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच आहे.


या उपवासामध्ये दैनंदिन जीवनशैलीमधून बाहेर पडून मनाला व शरीराला जास्तीत जास्त आरोग्यसंपन्न करण्याचा हा एक प्रयत्न असतो. या काळामध्ये कांदा, लसूण चुकूनही खाऊ नये असे आवर्जून सांगितले जाते. मांसाहार आणि मद्यप्राशन या काळात वर्ज्य आहे.


भगवद्गीतेमध्ये आहाराचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत.
1.सात्त्विक
2.राजसिक 
3.तामसिक


सात्त्विक पदार्थ म्हणजे जो पदार्थ ताजा आहे, कमीत कमी प्रक्रिया केलेला, पचायला हलका आहे व मधुर आहे. या ठिकाणी मधुर या शब्दाचा अर्थ गोड असा न घेता तो मधुर रसात्मक आहे म्हणजे सर्व शरीरातील धातूंना (Tissues) बल देणारा व पोषण करणारा आहे, जो आहार मनाला चिरकालीन उत्साह देतो, तो आहार सात्त्विक आहार समजावा.


अध्यात्मिक मार्गातील लोकांनी राजसिक आणि तामसिक पदार्थ उपवास काळामध्ये अवश्य खाणे टाळावेत. मानसिक शक्तीचा विकास करण्यासाठी सात्विक आहाराचे सेवन करावे. सर्व शाकाहारी पदार्थ (काही वगळून) सात्विक आहेत.


राजस पदार्थांमध्ये असे पदार्थ येतात जे पचायला जड आहेत. मसालेदार पदार्थ, शरीरात विदाह उत्पन्न करणारे पदार्थ, तिखट पदार्थ, मांसाहार, मिरे, सुंठ, लसूण यांसारखे उष्ण तीक्ष्ण पदार्थ राजस पदार्थांमध्ये मोडतात. असे पदार्थ, योग्य प्रमाणात घेणेच अपेक्षित असते. राजस पदार्थ प्रत्येक वेळेस शरीरास उपकृत असतीलच असे नाही. अशा पदार्थांचे सेवन प्रमाणात घेणेच आवश्यक आहे.


कांदा आणि लसूण तामसिक अन्न पदार्थांमध्ये गणले जातात. यामुळे अध्यात्म मार्गात या पदार्थांना वर्ज्य करण्यात आले आहे. लसूण आणि कांदा खाल्ल्याने तामसिक (रागीट, वाईट) विचार मनात निर्माण होतात तसेच शरीरात नकारात्मक उर्जा राहते. यामुळे कांदा आणि लसूण या काळात खाऊ नये.


जे पदार्थ ताजे नाहीत, जे पदार्थ तयार करताना खूप जास्त प्रक्रिया करावी लागते असे पदार्थ, शिळे अन्न, जे पचायला अत्यंत जड आहे, जे पदार्थ सेवन केल्यावर उत्साह हानी होते, मनाचा लोभ, क्रोध, भय, द्वेष व ईर्षा इ. गुण वाढतात तो सर्व आहार तामसिक आहार समजावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, नवरात्री काळात उपवासाचे कोणात पदार्थ खावेत..

बातम्या आणखी आहेत...