आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्री : लिक्विड डाएटच्या नावाखाली फक्त चहा घेऊन व्रत करू नका, वाचा उपवासाशी संबंधित 10 आवश्यक गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 10 ऑक्टोबरपासून नवरात्र चालू होत असून 18 ऑक्टोबरपर्यंत राहील. नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास करतात. हे अत्यंत हेल्दी आहे परंतु उपवास काळात बहुतांश लोक अशा चुका करतात ज्यामुळे उपवासाचा फायदा होण्याऐवजी नुकसान होते. एम्स नवी दिल्लीच्या असिस्टेंट डायटिशिअन रेखा पाल शाह यांनी उपवास काळात कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास फायदा होऊ शकतो याविषयी खास माहिती दिली आहे. या सर्व टिप्स उपवास करणाऱ्यांंनी अवश्य फॉलो कराव्यात.


कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
1. लिक्विड डाएटच्या नावाखाली फक्त चहा घेऊन व्रत करू नये. सॉलिड फूडही खाणे आवश्यक आहे.


2. शरीरातील ऊर्जा कायम ठेवण्यासाठी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आहार घ्यावा. फॅटी पदार्थ कमी खावेत. 


3. उपवास काळात फ्रुट, दूध, ज्यूस यासारखे पदार्थ घेतल्याने दिवसभरात शरीराला आवश्यक कॅलरी मिळतात.


4. उपवासात शिंगाडा पिठाचा किंवा भगरीच्या पिठाचा पराठा तयार करून खाण्याऐवजी पोळी तयार करून खाणे जास्त चांगले राहील.


5. उपवास काळात रिकाम्या पोटी राहिल्याने ऍसिडिटी वाढू शकते. यामुळे जास्त वेळ रिकाम्या पोटी राहू नये.


6. उपवासात आंबट फळ खाल्ल्याने जळजळ होऊ शकते. लिंबू, संत्री, मोसंबी यासारखे फळ खाण्याऐवजी सफरचंद खावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार टिप्स...

 

बातम्या आणखी आहेत...