आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेषपासून मीनपर्यंत, राशीनुसार करू शकता देवीची पूजा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शारदीय नवरात्री सुरु असून सोमवार 7 ऑक्टोबरला नवमी आणि 8 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार नवरात्री काळात राशीनुसार देवीची पूजा केली जाऊ शकते. असे केल्याने कुंडलीतील विविध दोष नष्ट होऊ शकतात. येथे जाणून घ्या, मेषपासून मीनपर्यंत सर्व 12 राशीच्या लोकांनी कोणत्या देवीची उपासना करावी...

मेष - या राशीच्या लोकांनी स्कंदमातेची विशेष उपासन करावी. दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. स्कंदमाता करुणामयी आहे. ही वात्सल्याची देवी आहे.

वृषभ - या राशीच्या लोकांनी महागौरी स्वरुपाची उपासना केल्यास विशेष फळ प्राप्त होतात. ललिता सहस्त्रनामाचे पाठ करावेत. ही जन-कल्याणकारी देवी आहे. अविवाहित मुलीनी या देवीची उपासना केल्यास मनासारखा पती मिळेल.

मिथुन - या राशीच्या लोकांनी देवी यंत्र स्थापित करून ब्रह्मचारिणी देवीची उपासना करावी. तारा कवचचे पाठ करावेत. ब्रह्मचारिणी ज्ञान प्रदाता देवी आहे.

कर्क - या राशीच्या लोकांनी शैलपुत्री देवीची उपसना करावी. लक्ष्मी सहस्त्रनाम पाठ करावेत. भगवतीची ही वरद मुद्रा अभय प्रदान करते.

सिंह - या राशीच्या लोकांनी कूष्मांडा देवीची उपासना करावी. दुर्गा मंत्रांचा जप करावा. असे मानले जाते की, देवीच्या हास्याने या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे.

कन्या - या राशीच्या लोकांनी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी. लक्ष्मी मंत्राचा विधिवत जप करा. विद्यार्थ्यांना या देवीची उपासना विशेष लाभदायक आहे.

तूळ - या राशीच्या लोकांनी महागौरीची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. सप्तशतीचे पाठ करावेत.

वृश्चिक - या राशीच्या लोकांनी स्कंदमातेची विशेष उपासन करावी. दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत.

धनु - या राशीच्या लोकांनी चंद्रघंटा देवीची उपासना करावी. घंटा ब्रह्मनादाचे प्रतिक आहे. साधकाची भीती व विघ्न आपल्या ध्वनीने ही देवी दूर करते. 

मकर - या राशीच्या लोकांनी कालरात्री देवीची उपासना करावी. नर्वाण मंत्राचा जप करावा. अंधकारामध्ये भक्ताचे मार्गदर्शन आणि प्राकृतिक प्रकोपातून मुक्तता करते. ही शत्रू संहारक देवी आहे.

कुंभ - या राशीच्या लोकांनी कालरात्री देवीची उपासना करावी. नर्वाण मंत्राचा जप करावा. अंधकारामध्ये भक्ताचे मार्गदर्शन आणि प्राकृतिक प्रकोपातून मुक्तता करते. ही शत्रू संहारक देवी आहे. 

मीन - या राशीच्या लोकांनी चंद्रघंटा देवीची उपासना करावी हळदीच्या माळेने बगलामुखी मंत्राचा जप करावा.

बातम्या आणखी आहेत...