आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माता पार्वतीच्या रथावरील नगर परिक्रमेने नवरात्रोत्सवाचा समारोप, शोभायात्रेत एक लाख भाविक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक  - थायलंडची राजधानी बँकॉकमधील सर्वात प्राचीन हिंदू मंदिर श्री मरियम्मनमध्ये नवरात्र उत्सवाच्या अखेरच्या दिवशी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १ लाखाहून जास्त लोक सहभागी झाले. नवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी येथे माता दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती व उमाथेवी (पार्वती) यांना आवाहन केले जाते. दरदिवशी वेगवेगळ्या प्रकारे आयोजन केले जाते. सकाळ, दुपार व सायंकाळी विशेष पूजा केली जाते. कार्यक्रमाचा समारोप विजयादशमीच्या दिवशी होतो. या दिवशी मंदिराजवळील मुख्य रस्ता बंद करण्यात येतो. माता पार्वतीची भव्य शोभायात्रा काढली जाते. यात्रेत ५ रथ सहभागी होतात. त्यात पार्वतीशिवाय गणेश, कार्तिकेय, कृष्ण, मुरुगन विराजमान असतात. यात्रा पुन्हा मंदिरात परतण्यासाठी सुमारे ७ तासांचा कालावधी लागतो. हजारोंच्या संख्येत भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात. 

१४० वर्षांपूूर्वीच्या मंदिरात माता पार्वती दक्षिण भारतीय स्वरूपात विराजमान 
१८७९ मध्ये या मंदिरात माता पार्वतीची दक्षिण भारतीय स्वरूपात स्थापना करण्यात आली. नवरात्रीत मंदिर परिसरात माता दुर्गेच्या भव्य मूर्तीची स्थापना केली जाते. मंडपाला फुलांनी सजवले जाते. या निमित्ताने तलवारबाजीचेही आयोजन केले जाते. 

बातम्या आणखी आहेत...