आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र : घटस्थापना शुभ मुहूर्त, यावर्षी नवरात्रीला जुळून येत आहे दुर्लभ संयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्र 10 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये अनेक वर्षानंतर शुभ संयोग जुळून येत आहेत. ग्रह-नक्षत्रांचे हे संयोग अत्यंत खास राहतील. कशी हिंदू विश्वविद्यालयाचे ज्योतिषाचार्य पं गणेश मिश्रा यांच्यानुसार या वर्षीसुद्धा तिथी क्षय नसल्यामुळे नवरात्री संपूर्ण नऊ दिवस राहील. यावेळी देवी दुर्गा बुधवारी नावेमध्ये स्वार होऊन येत आहे. नौकावाहनमधून देवी येत असल्यामुळे सर्वसिद्धी प्राप्त होते. हा देशाच्या भाग्याचा संकेत आहे. शारदीय नवरात्री 9 दिवसांची असणे हे सलग दुसरे वर्ष आहे. 2019 मध्येच असे राहील.


- या वर्षी नऊ दिवसांच्या नवरात्रीमध्ये दोन गुरुवार येत असल्यामुळे हा अत्यंत शुभ संयोग आहे. कारण गुरुवारी करण्यात आलेल्या दुर्गा पूजेचे फळ कित्येक पट फलदायी मानले जाते. ग्रहांची स्थिती पाहता शुक्र ग्रह स्वगृही असणे शुभफळ देईल.


- या व्यतिरिक्त नवरात्रीमध्ये राजयोग, द्विपुष्कर, अमृत योगासोबतच सर्वार्थसिद्धी आणि सिद्धीयोगचा संयोगही जुळून येत आहे. या विशेष योगांमध्ये करण्यात आलेल्या पूजापाठ आणि खरेदीचे अत्याधिक शुभ आणि फलदायी फळ प्राप्त होतील. यामुळे नवरात्रीमध्ये पूजापाठ करण्यासोबतच मंगलकार्याची खरेदी करणे शुभ मानले जाईल. या नवरात्रीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने, कपडे आणि वाहन खरेदी करणे शुभ राहील.


घटस्थापना शुभ मुहूर्त 
- सकाळी -  06 वाजून 18 मिनिटांपासून 10 वाजून 11 मिनिटांपर्यंत.


चित्रा वैधृति योग निषेध सति संभवे पालनीयो।
ननु निषेधानुरोधेन पूर्वाह्न:प्रारम्भकाल: प्रतिपत्तिथिर्वाsतिक्रमणीय:।।


- पं मिश्रा यांच्यानुसार 10 ऑक्टोबरला चित्र नक्षत्र आणि वैधृती योग आहे. चित्र आणि वैधृतीमध्ये कलश स्थापन वर्ज्य आहे. यामुळे कलश स्थापन विधी सकाळी 7:59 पर्यंतच करून घ्यावे.


- शक्य असल्यास वर्ज्य नियमाचे पालन करावे. परंतु प्रतिपत्तिथि तथा पूर्वाह्न काळाचे अतिक्रमण होणार नाही याकडे लक्ष द्यावे. देवीचे आवाहनमी स्थापन आणि विसर्जन तिन्ही कर्म प्रातःकाळीच होतात.


कधी होणार महाष्टमीमी नवमी पूजा आणि दसरा
महाष्टमी व्रत-  बुधवार 17 ऑक्टोबर 2018

महानवमी व्रत- गुरुवार 18 ऑक्टोबर 2018
विजयादशमी (दसरा) , नवरात्री व्रत पारण - शुक्रवार 19 ऑक्टोबर 2018

बातम्या आणखी आहेत...