आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ घरात करावी लोबान, गुगुळ आणि चंदनाची धुनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या देवी दुर्गा पूजेचा महापर्व नवरात्री सुरु आहे. सोमवार 7 ऑक्टोबरला नवमी आणि मंगळवार 8 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. बहुतांश लोक दशमी तिथीला देवी मूर्तीचे विसर्जन करतात. नवरात्री काळात पूजा-पाठ करणाऱ्या भक्तांनी क्रोधापासून दूर राहावे. क्रोधामुळे मनाची एकाग्रता भंग होते आणि आपले मन पूजेमध्ये लागत नाही. या दिवसांमध्ये धर्म-कर्मामध्ये मन लावावे. अधार्मिक कामापासून दूर राहावे. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात...

  • मान्यतेनुसार भगवती दुर्गा देवीला धूपचा सुंगध अत्यंत प्रिय आहे. यामुळे नवरात्री काळात सकाळ-संध्यकाळ गाईच्या शेणाऱ्या गोवऱ्या जाळून त्यावर लोबान, गुगुळ आणि चंदन पावडर एकत्र करून धूप करावी. याच्या सुगंधाने घराचे पावित्र्य कायम राहते. घरातील हानिकारक सूक्ष्म किटाणू नष्ट होतात.

  • देवी दुर्गाची पूजा करणाऱ्या भक्ताने दुर्गा सप्तशतीच्या 11व्या अध्यायाचा नियमित पाठ करावा.

  • नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात लाल ध्वज म्हणजे झेंडा दान करावा. देवी भगवतीला 7 विलायची आणि खडीसाखर नैवेद्य दाखवावा. नवमी तिथीला एक लाल साडी, हळद-कुंकू, बांगड्या देवीला अर्पण कराव्यात.

  • नवरात्रीच्या सप्तमी तिथीला फलाहार व्रत करावे आणि एखाद्या मंदिरात केळीचे एक झाड लावावे.

  • नवरात्री काळात अष्टमी आणि नवमी तिथीला कुमारिकांना जेवू घालावे. आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे.