आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहस्यमयी मानले जाते देवीचे कामाख्या मंदिर, प्रसाद स्वरूपात दिला जातो ओला कपडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शारदीय नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. यामुळेच प्रमुख देवी मंदिरात भक्तांची गर्दी होत आहे. आसाममधील गुवाहाटी येथे स्थित कामाख्या शक्तीपीठवर लोकांची विशेष श्रद्धा आहे. ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले.


असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते. कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेले आहे. आज आम्ही तुम्हाला कामाख्या शक्तीपीठाशी संबंधित 6 रोचक तथ्य सांगत आहोत.


येथे देवी प्रत्येक वर्षी होते रजस्वला
या शक्तीपीठाविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे. कथेनुसार या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला होता. यामुळे देवी येथे प्रत्येक वर्षी तीन दिवसांसाठी रजस्वला होते. या काळात मंदिर बंद असते. तीन दिवसांनतर मंदिर पुन्हा उघडले जाते.


प्रसाद रुपात भक्तांना दिला जातो ओला कपडा
येथे प्रसाद रुपात भक्तांना ओला कपडा दिला जातो. या वस्त्राला अम्बुवाची वस्त्र म्हणतात. देवी रजस्वला असताना मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजने लाल रंगाने भिजलेला असतो. त्यानंतर हे वस्त्र प्रसाद स्वरुपात भक्तांना वाटले जाते.


मंदिरात नाही देवीची मूर्ती
या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असते. येथून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे पीठ देवीच्या इतर सर्व पीठामध्ये महापीठ मानले जाते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराविषयी इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...