Business / कर्करोगग्रस्तांना ६८ तासांत तज्ञांचा सल्ला देण्यासाठी सुरू केले 'नव्व्या स्टार्टअप'; ६८ देशांतल्या ३६ हजार रुग्णांना केली मदत

मशीन लर्निंग आणि एआयच्या मदतीने डेटा अॅनालिसिस आणि रुग्ण सल्ल्यावर केले काम

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 10,2019 09:51:00 AM IST

नवी दिल्ली : उद्याेग सुरू करण्यासाठी साधारणत: वेगवेगळ्या कल्पना आजमावल्या जातात, परंतु अमेरिकेतल्या मॅसाच्युसेट्समध्ये राहणाऱ्या गीतिका श्रीवास्तव यांना ही प्रेरणा मिळाली ती दु:खद घटनेतून. कुटुंबातील सदस्याला कर्कराेगाचे निदान झाल्यावर उपचारासाठी त्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागले. दुसऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी गीतिका यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 'न‌व्व्या केअर स्टार्टअप' सुरू केले. टाटा मेमाेरियल सेंटर आणि नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या मदतीने क्लिनिकल डेटा अॅनालिसिस आणि पेशंट अॅडव्हाेकसीसाठी २०१५ वर्षात सुरू झालेले न‌व्व्या केअरने आतापर्यंत ६८ देशांतल्या ३६ हजार कर्करुग्णांना सल्ला दिला आहे. वर्षाला अडीच लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्यांना माेफत सेवा देण्यात येते, तर यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी केवळ ८,५०० शुल्क आकारण्यात येते. बायाेटेक्नाॅलाॅजी आणि हेल्थ केअर क्षेत्रातील ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंगचा उपयाेग करते. गीतिका म्हणतात, रुग्णाला सगळ्यात आधी कंपनीच्या वेबसाइटवर नाेंदणी करावी लागते. त्यानंतर रुग्णालयाचे प्रतिनिधी रुग्णाशी चर्चा करून त्यांना आपले रिपाेर्ट अपलाेड करण्यासाठी किंवा ई-मेलने पाठवण्यासाठी सांगितले जाते. रुग्ण आपला रिपाेर्ट व्हाॅट्सअॅपनेही पाठवू शकतात. हा रिपाेर्ट कंपनीच्या साॅफ्टवेअरमध्ये फिल्टर हाेऊन तीन तज्ञांकडे पाठवला जाताे. त्यानंतर तज्ञ आपला सल्ला अपलाेड करतात. रुग्णावर कशा प्रकारे उपचार करता येतील त्याची पध्दत कंपनी अवलंबते आणि हा उपचार काेणत्या रुग्णालयात हाेऊ शकताे, काेणत्या ठिकाणी काय सुविधा आहेत याची माहिती रुग्णाला दिली जाते. गीतिका म्हणाल्या, सुरुवातीला कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने कंपनी सुरू केली. हाेंडा, महिंद्रा व टाटासारख्या अनेक कंपन्या आपल्या सीएसआर फंडातून मदत करतात. विविध एनजीअाे, इन्शुरन्स पार्टनर, रुग्णालय,संस्थांच्या मदतीने कंपनी कर्कराेेगग्रस्त रुग्णापर्यंत पाेहोचते. त्यांच्या मदतीला हार्वर्डमध्ये शिकलेले डाॅ. नरेश रामराजन सहसंस्थापक आहेत. हार्वर्ड मेडिकल स्कूल, यूसीएलए, एम्स, मॅक्स हॉस्पिटल संस्था जाेडल्या आहेत.


जगातील सर्वाेत्तम तंत्रज्ञान आणि अाैषधांची मिळते माहिती
कर्कराेगग्रस्तांचा वेळ, प्रवास, पैसा याची बचत करते कंपनी
गीतिका म्हणतात, कर्करुग्णांचा रिपाेर्टमध्ये खूप वेळ, प्रवास आणि खर्च हाेताे. कंपनी आपल्या साेल्युशनमध्ये या तीन गाेष्टींची कपात करते. अमेरिकेतील ख्यातनाम संशाेधक, रुग्णालये कंपनीशी जाेडली आहेत. गीतिका म्हणाल्या, त्यांचे अल्गाेरिदम दुसऱ्या आजारांसाठीही लागू पडते. त्यांचे लक्ष कॅन्सरवर केंद्रित आहे. बंगळुरूमध्ये कंपनीचे कार्यालय आहे, पण मुंबई आणि अमेरिकेत काम केले जाते.


अवघ्या २३ व्या वर्षी स्टार्टअप सुरू केले, नफ्यात विक्री
गीतिका आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगण्यास संकाेचतात, पण त्यांचे वैयक्तिक जीवन काही कमी प्रेरणादायी नाही. त्या जगातील सहाव्या आणि भारतातील सर्वात उंच महिला आहेत. त्यांची उंची ६ फूट ११ इंच आहे. त्यांचे वडील प्रसिद्ध बास्केटबाॅलपटू हाेते आणि गीतिका याही. हार्वर्ड विद्यापीठातून काॅम्प्युटर इंजिनिअरिंग आणि एमआयटीतून एमबीएचे शिक्षण घेतले अाहे. त्यानंतर त्या सामान्य जीवन जगत आहेत. गितिका यांनी अवघ्या २३ व्या वर्षी स्कायरिश स्टार्टअप सुरू केले. त्यानंतर त्याची विक्री केली. त्यांना व्हेंचर कॅपिटलमध्ये रुची आहे.

X
COMMENT