आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा रविवारी बांद्रामध्ये स्पॉट झाली. यावेळी नव्या विना मेकअप दिसली. तिने ब्लू टॉप आणि डेनिम घातली होती. यासोबतच तिच्याजवळ बॅग होती. तर दिर्घकाळापासून चित्रपटांमध्ये दिसत नसणारा फरदीन खानही बायको नताशा माधवानीसोबत बांद्रा येथे स्पॉट झाला. यावेळी फरदीन कॅज्यूअल लूकमध्ये दिसला. त्याने पोनी टेल घातली होती.
लठ्ठपणामुळे झाला होता हैराण
फरदीन खानचा अनयूजुअल लूक सर्वात पहिले मे, 2016 मध्ये समोर आला होता. ऐकेकाळी चॉकलेट बॉयच्या नावाने प्रसिध्द असलेला फरदीन ओव्हरवेटेड झाला होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटोज व्हायरल होत होते. यानंतर त्याची खिल्ली उडवण्यात आली. लोकांनी त्याला फरदीन ऐवजी 'फरदीना' म्हणायला सुरुवात केली. यानंतर फरदीनने फेसबुक पोस्ट लिहून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.
8 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे फरदीन
फरदीनने 1998 मध्ये करिअरची सुरुवात केली. 'प्रेम अगन' हा त्याचा पहिला चित्रपट होता. यानंतर तो 'जंगल', 'लव के लिए कुछ भी करेगा', 'भूत', 'जानशी', 'नो एंट्री', 'हे बेबी', 'ऑल द बेस्ट', 'देव', 'लाइफ पाटर्नर', 'एसिड फैक्ट्री' सोबतच अनेक चित्रपटांमध्ये दिसला. 2010 मध्ये आलेला 'दुल्हा मिल गया' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आणि आता त्याच्याजवळ कोणताही प्रोजेक्ट नाही.
2005 मध्ये मुमताजच्या मुलीसोबत केले लग्न
फरदीनने 14 सप्टेंबर, 2005 मध्ये अभिनेत्री मुमताजची मुलगी नताशा माधवानीसोबत लग्न केले. नताशाने 2013 मध्ये मुलगी डियानी इसाबेलला जन्म दिला. यानंतर फरदीन ऑगस्ट 2017 मध्ये दूस-यांदा बाबा बनला. नताशाने एका मुलाला जन्म दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.