आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतून भाजपाला संपवण्याची सुरुवात आजपासूनच, मिशन 2022 आजपासून सुरू करतोय - नवाब मलिक

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीचे मिशन नक्की यशस्वी होणार - सुनिल तटकरे

मुंबई- मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपाला मुंबईतून संपवण्याची तयारी आजपासून सुरू झाली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मिशन 2022 मुंबई महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले. 

मिशन 2022 आजपासून सुरू करतोय. आगामी दोन वर्षांत 227 वॉर्डमध्ये संघटनेला ताकदीने उभं करण्याची माझी जबाबदारी आहे. 20 वर्षे जबाबदारी होते ते पक्ष सोडून गेले. पक्ष निष्ठा ठेवून काम केलात व पक्ष जिवंत ठेवलात त्याबद्दल सर्वांना नवाब मलिक यांनी धन्यवाद दिले. 

गेली 20 वर्ष 14 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले नाहीत. दोन वर्ष शिल्लक असताना का सुरुवात केली तर नीट ठरवून नियोजन केले तर दादांनी सांगितले त्याप्रमाणे 50 पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेत जिंकता येतील असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला. 


या महिन्यात दोन वर्षाचे कार्यक्रम ठरवले आहे. त्यामुळे येत्या 10 जूनला पक्षाचा वर्धापन दिन आम्ही साजरा करु असे नवाब मलिक यांनी जाहीर केले. कार्यकर्ते स्वतः च्या खिशातील पैसे खर्च करून या शिबिराला जमले आहेत. मुंबई ही बहुवासीय नगरी आहे. श्रीमंत आणि गरीबही रहातो. त्याचा बॅलन्स करायचा आहे. टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या लोकांनी गरीबांशी वाद करु नका. नाहीतर तुमच्या घरची भांडी घासायला कोण मिळणार नाही. झोपडीत राहणारा माझा गरीब माणूस आहे. श्रीमंत आणि गरीब असा वाद होता कामा नये असेही नवाब मलिक म्हणाले. 

सर्वांना घरे देण्याची पॉलिसी तयार करण्याचे धोरण राबवले जाईल असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. फेरीवाल्यांचा, सुरक्षा रक्षक, यांचेही मोठे प्रश्न आहेत. यांची पिळवणूक होत आहे ही पिळवणूक करण्याचे काम भाजपाचे लोक आहेत. अशांना जेलमध्ये टाकल्या‌शिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला.

बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. बजेट झाल्यानंतर इतर राज्यात कुठली योजना नसेल अशी योजना कौशल्य विकास मार्फत करणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी यावेळी केली.
पाच वर्ष एकनिष्ठ राहिले आहेत त्यांना न्याय देण्याचे पवारसाहेबांचे आदेश आहेत. त्यांनाच न्याय दिला जाईल. आयाराम गयारामांना संधी दिली जाणार नाही असे आश्वासन नवाब मलिक यांनी दिले.

राष्ट्रवादीचे मिशन नक्की यशस्वी होणार - सुनिल तटकरे
मुंबईत बर्‍याच वर्षांनी पाच हजार कार्यकर्त्याचे शिबीर घेतले जाते आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे हे मिशन नक्की यशस्वी होईल असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिराचा समारोप भाषणात बोलत होते.

23 वर्षापुर्वी राष्ट्रवादीची स्थापना मुंबईच्या शिवाजी पार्कवर झाली. मनपा निवडणुकीत इतर पक्षांसोबत आघाडी करुन लढलो आहोत. बर्‍याच वर्षानंतर राष्ट्रवादी मुंबईत शक्ती दाखवण्यात नवाब मलिक यांना यश आले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. 

पवारसाहेबांनी पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली. पक्षालाच नव्हे तर देशातील अनेक पक्षांना दिशा देण्याचे काम केले आहे. तुम्हा - आम्हाला पवारसाहेबांसारखे नेतृत्व लाभले आहे. कसोटी दाखवणारे क्षण गेल्या पाच वर्षात आपण अनुभवले आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. 

पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करताना मुंबईतही पक्ष वाढेल असे काम केले. तसे काम मुंबई महानगरात पवारसाहेबांचे विचार रुजवण्याचे काम नवाब मलिक करत आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.  आजची हीच शक्ती भविष्यात दाखवाल आणिमहानगरपालिकेत यश मिळवाल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

 

बातम्या आणखी आहेत...