आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी सचिन अहिर शिवसेनेत- नवाब मलिक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पक्ष सोडला म्हणून दु:ख झाले नाही तर विश्वास टाकूनही विश्वासघात केल्याने दु:ख झाले. मात्र त्यांनी शरद पवारसाहेबांचे स्वप्न साकार केले नाही ते बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न काय साकार करणार आहेत. ते फक्त स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी गेले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.मुंबई शहरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जिवंत आहे. त्यामुळे यापुढे पक्षातील कार्यकर्ता मोठा होईल असा विश्वास नवाब मलिक यांनी दिला. 


पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत, त्या अनुषंगाने पुन्हा राष्ट्रवादी मुंबईत वाढवू असे आवाहन नवाब मलिक यांनी केले. 9 ऑगस्ट क्रांती दिनी 10 हजार लोकांची भव्य रॅली काढून षण्मुखानंद सभागृहात मेळावा घेवून पक्षाची ताकद दाखवली जाईल असेही नवाब मलिक यांनी जाहीर केले.


मुंबईला जो नेता शरद पवारसाहेब देतील त्याच्या मागे यापुढे उभे रहायचे आहे. एक गेला म्हणून काही फरक पडत नाही असे आमदार हेमंत टकले यांनी ठणकावून सांगितले. मतलबासाठी, स्वार्थासाठी जो पक्ष सोडू शकतो अशा कृतघ्नता दाखवणार्‍याला त्याची जागा दाखवून देवूया असे आवाहनही आमदार टकले यांनी केले. 


यावेळी पक्ष कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून सचिन अहिर यांच्या शिवसेनेत जाण्याचा आनंदोत्सव साजरा केला. सचिन अहिर शिवसेनेत गेल्यानंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यालयात जमा झाले आणि त्यांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले नाहीत. यासंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये पुर्ण ताकदीने मुंबईत काम करण्याचे ठरवण्यात आले. 

 


यावेळी बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, आमदार हेमंत टकले, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आदींसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.