आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nawada Molestation Case: Woman Has Been Badly Assaulted Husband Admitted Her In Hospital

शेतातून घराकडे जात होती महिला, एकटीला पाहून नराधमाची बिघडली नियत, भररस्त्यातच अब्रूवर घाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवादा - बिहारच्या नवादा जिल्ह्यात एका महिलेवर बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधमाने महिलेला बेदम मारहाणही केली. महिलेच्या पतीने तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. पीडित महिलेचा पती नरेशने सांगितल्यानुसार, ते शेतात पिकाची कापणी करत होते, यादरम्यान मी पत्नीला घरी पाठवले. परंतु वाटेत श्री यादव याने माझ्या पत्नीवर बलात्कार केला. तिला बेदम मारहाणही केली. तिच्या चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. कसेबसे तिला मी लोकांच्या मदतीने रुग्णालयात पोहोचवले. रजौलीच्या रुग्णालयातील डॉ. सतीश चंद्र म्हणाले की, महिलेला बेशुद्धावस्थेत दाखल करण्यात आले होते. येथे महिला डॉक्टर नाहीत, यामुळे महिलेला प्रथमोपचारांनंतर नवादाच्या जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...