आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर नगर पालिका पोटनिवडणूक मतदान शांततेत पार पडले, दोन्ही प्रभागाची एकूण 54.97 टक्केवारी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवापूर- नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अमान्य करण्यात आल्याने पालिकेतील प्रभाग क्रमांक सहा अ व सात अ मधील दोन पालिका सदस्यांची पोटनिवडणुक 29 डिसेंबर रोजी झाली. यासाठी प्रभाग क्रमांक सातचे मतदान केंद्र सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा व उर्दू शाळेत होते तर प्रभाग क्रमांक सहाचे मतदान केंद्र सार्वजनिक गुजराती हायस्कूल मध्ये होते. दोन्ही प्रभागात सकाळी 9 वाजेपर्यंत अल्प प्रतिसाद मिळाला दुपारी थोडा प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढली त्यानंतर चार मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणात मतदाराची मतदान केंद्रात गर्दी झाली. सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा होत्या. दोन्ही प्रभागासाठी सहा मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या पोट निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न राबवले जात तर विरोधात भाजपा व अपक्ष उमेदवार असल्याचे चित्र दिसून आले. दोन्ही प्रभागात महाविकास आघाडीचे काॅग्रेस व शिवसेना यांची भाजपा उमेदवारी सोबत दुरंगी लढत जरी असली तरी अपक्ष उमेदवार पराभूत करण्यास निर्णयक ठरवले.सकाळी दहा वाजता मतमोजणी, अर्धा तासात निकाल


मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजता सुरूपसिंग नाईक नगर भवनात सुरूवात होईल. यात दोन प्रभागासाठी दोन टेबल, तीन फे-या असे नियोजन केले आहे. साधारण निकाल अकारा वाजेच्या आता लावण्यात येईल. साधारण नगर पालिका अधिकारी व कर्मचारी सह 15 कर्मचारी नियुक्त केले आहे. अशी माहिती निवडून निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी दिली. यावेळी निवडणुकीचे काम सहायक निवडुन निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे, कार्यालय अधीक्षक अनिल सोनार, मनोज पाटील, सचिन अग्रवाल, राजेंद्र चव्हाण, आर डी लांबभोडे, मतदान क्षेत्रिय अधिकारी एम एस भामरे आदि कर्मचा-यांनी पाहिले. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी, नासिर पठाण, धीरज महाजन, पोलीस कर्मचारी 28 होमगार्ड 10 असा चोख बंदोबस्त तैनात केला होता.

दोन्ही प्रभागातील मतदानाची गोळाबेरीज 


प्रभाग क्रमांक सहा एकूण मतदार 3006 
पुरूष 1481, स्त्री 1525 इतर 0
बुथ क्रमांक 1 एकूण मतदान (1003) पैकी 585 टक्केवारी 58.32
बुथ क्रमांक 2 एकूण मतदान( 1002) पैकी 525 टक्केवारी 52.39
बुथ क्रमांक 3 एकूण मतदान(1001 )पैकी517टक्केवारी 51.64
एकूण टक्केवारी 54.12प्रभाग क्रमांक सात एकूण मतदार 3436
 
पुरूष 1735, स्त्री 1701 इतर 0
बुथ क्रमांक 1,एकूण मतदान (1146) पैकी 682 मतदान झाले , 59.51 टक्केवारी 
बुथ क्रमांक 2,एकूण मतदान (1145) पैकी 661 मतदान झाले, टक्केवारी 57.72
बुथ क्रमांक 3, एकूण मतदान (1145) पैकी 575, 50.21 टक्केवारी 
एकूण टक्केवारी 55.82 

दोन्ही प्रभागातील सात उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद 
प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये 


1) सौ. सुरेखा प्रकाश जगदाळे, काॅग्रेस 
2)फेमिदा फिरोज फेन्सी, अपक्ष 
3) सौ.जिग्नेशा संदीप राणा,भाजपा 

प्रभाग क्रमांक सात अ मध्ये 


1) मनोज रमेश चव्हाण, शिवसेना
2)महेंद्र अशोक दुसाणे, भाजपा 
3)सुनिल धाकू भोई, अपक्ष
4)गणेश भानुदास वडनेरे, अपक्ष 

दोन्ही प्रभागातील सात उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...