आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजुद्दीनच्या कुटुंबातून आली वाईट बातमी, सात वर्षांपासून गंभीर आजाराशी लडा देत आहे बहीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीला वयाच्या 18 व्या वर्षापासून ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे स्वतः नवाजुद्दीनने सांगितले आहे. बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन नवाजुद्दीनने सांगितले की, माझी बहीण वयाच्या 18 व्या वर्षी तिला अॅडवान्स्ड स्टेज ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. ती आत्मविश्वास आणि धाडसाने या आजाराचा सामना करत आहे. आता ती 25 वर्षांची झाली आहे. माझ्या बहिणीला मोटिव्हेट करण्यासाठी डॉ. आनंद कोप्पिकर आणि ललेश बुशरी यांचे खूप खूप आभार.

डॉक्टर्सनुसार, ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे ओळखून पहिल्याच स्टेजपासून उपचार सुरु केले तर रुग्ण बरे होण्याची आशा 80% पेक्षा अधिक असते. दुस-या स्टेजपासून उपचार सुरु झाल्यानंतर 60-70% महिला ब-या होतात. तिस-या आणि चौथ्या स्टेजला याविषयी समजल्यास आजारावर नियंत्रण मिळवणे कठीण असते. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांना ओळखणे गरजेचे आहे. अपोलो इंद्रप्रस्थ हॉस्पिटल, दिल्लीचे सीनियर कन्सल्टंट (सर्जिकल ऑन्कोलॉजी अँड रोबॉटिक) डॉ. समीर कॉल यांनी ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांविषयी सांगितले आहे.

 

काय आहेत ब्रेस्ट कॅन्सरची कॉमन लक्षणे...

- स्तनांना सुज येत असेल, किंवा त्याचे टिश्यूज अचानक मोठे होत असल्याचे वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण आहे.
- ब्रेस्टमध्ये दुखत असेल किंवा अचानक ते मऊ वाटत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. या आजारात गाठ आल्यास ती गाठ दुखत नाही. क्वचित रुग्ण दुखण्याची तक्रार करतात.
- ब्रेस्टमध्ये अचानक एखादी गाठ आल्यास ते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. या गाठीमुळे कधी दुखू शकत तर कधी दुखणे नसते.
- ब्रेस्टच्या जवळपासच्या त्वचेत बदल उदाहरणार्थ रैशेज, चकत्ते दिसणे, स्किन ड्राय होणे ही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे असू शकतात.
- निप्पलमध्ये बदल दिसून येणे, त्याचा रंग बदलणे, त्याला खाज सुटणे, आग होणे, त्याच्या आजुबाजुला दाणे येणे ही देखील ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आहेत.
- निप्पलमधून पाढंरा, लाल किंवा अन्य प्रकारचा डिस्चार्ज किंवा रक्त येणे हे देखील ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण आहे.
- ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अंडर आर्म्समध्ये सूज येऊ शकते.
- डाएट किंवा लाइफ स्टाइलमध्ये बचल होणे, अचानक वजन कमी होणे, हीदेखील ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आहेत.

 

याच्या बचावासाठी काय करायला हवे...

- दारु आणि धुम्रपान करु नये.
- शरीराचे वजन नियंत्रिक ठेवणे.
- नियमित एक्सरसाइज करणे.
- खाण्याच फॅटचे प्रमाण कमी ठेवणे. 
- एखादे लक्षण दिसल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवणे.  

बातम्या आणखी आहेत...