• Home
  • News
  • Nawazuddin Siddiqui to be awarded at the Singapore Film Festival, award for Sacred Games

यश / सिंगापुर फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे नवाजुद्दीन सिद्दीकी, सॅक्रेड गेम्ससाठी मिळणार अवार्ड

वेब सिरीजपासून आता दूर राहणार नवाजुद्दीन

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 05:05:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : कार्डिफ फिल्म फेस्टिव्हलनंतर नवाजुद्दीन सिद्दीकीला सिंगापुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून बोलावणे आले आहे. येथे नवाजला वेब सीरीज 'सॅक्रेड गेम्स' साठी सन्मानित केले जाणार आहे. अशातच हिट वेब सीरीज सॅक्रेड गेम्सचा दूसरा पार्ट रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांनी ते खूप पसंतही केले. नवाज सध्या अथिया शेट्टीसोबत आपला आगामी चित्रपट 'मोतीचूर चकनाचूर' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

सिंगापुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल चे 30 वे कार्यक्रम 21 नोव्हेंबरपासून 8 डिसेंबरपर्यंत आयोजित केले गेले आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला तिसऱ्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबरला लेसले हो एशियन फिल्म टॅलेंट अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे. यापूर्वी नवाज वेल्समध्ये आयोजित कार्डिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही सन्मानित केले गेले आहे. त्याला विश्व सिनेमामध्ये योगदानासाठी गोल्डन ड्रॅगन अवार्डने नावाजले गेले आहे.

वेब सीरीजपासून आता दूर राहणार नवाजुद्दीन...

हिट वेब सीरीज 'सॅक्रेड गेम्स' च्या जोरदार यशानंतरही नवाजुद्दीन सिद्दीकीने वेब सीरीजपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याने हा निर्णय मुलगी शोरासाठी घेतला आहे. त्याचे म्हणणे आहे की, नकारात्मक भूमिका केल्यामुळे त्याची प्रतिमा बदलत आहे. त्यामुळे आता तो कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट करू इच्छितो. सोबतच तो म्हणाला की, माझी मुलगी अजून छोटी आहे मी तिला सॅक्रेड गेम्स दाखवू शकत नाही.

X
COMMENT