आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nawazuddin Siddiqui's 26 Year Old Sister Saima Died In Pune Hospital, Fighting Cancer For 8 Years

पुण्यातील रुग्णालयात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 26 वर्षीय बहिणीचे निधन, 8 वर्षांपासून देत होती कॅन्सरशी लढा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची धाकटी बहीण सायमा तमशी सिद्दीकीचे निधन झाले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. ती 26 वर्षांची होती. गेल्या आठ वर्षांपासून ती ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होती. नवाजचा धाकटा भाऊ अयाजुद्दीन सिद्दीकीने ही माहिती दिली. नवाज सध्या अमेरिकेत असल्याचे अयाजुद्दीनने सांगितले. पण बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच तो भारतात परततोय.
 

  • बुधनामध्ये सुपुर्द-ए-खाक होणार सायमा...

नवाजुद्दीनचा भाऊ फैजुद्दीन सिद्दीकी सायमाचे पार्थिव घेऊन पुण्याहून त्यांच्या गावी बुधना (उत्तर प्रदेश) साठी रवाना झाले आहेत. नवाजचे इतर भाऊ अयाजुद्दीन, माजुद्दीन आणि मिनहाजुद्दीन बुधना येथे आहेत.  नवाजशिवाय त्याचे आणखी दोन भाऊ दिग्दर्शक शमास नवाब सिद्दीकी आणि अॅडव्होकेट हाजी अलमाजुद्दीन सिद्दीकी हेदेखील शनिवारी रात्रीपर्यंत बुधनाला पोहोचतील. सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आठ वाजता सायमाला बुधना येथे सुपुर्द-ए-खाक केले जाईल.     

बातम्या आणखी आहेत...