Home | News | nawazuddin siddiquis brother files defamation suit against publication for maligning his name

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या भावाने प्रकाशन संस्थेविरोधात केला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 04:19 PM IST

'शमशुद्दीनच्या वागणूकीमुळे अनेक अभिनेत्रींना चित्रपट सोडावा लागला' मीडिया रिपोर्ट्सचा दावा

  • nawazuddin siddiquis brother files defamation suit against publication for maligning his name

    मुंबई - नवाझुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमशुद्दीनने एका प्रकाशन संस्थेविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. शमशुद्दीन स्त्री कलाकारांसोबत गैरवर्तणूक करत असल्याचा दावा एका प्रकाशन संस्थेने केला होता. 'शमशुद्दीनच्या वागणूकीमुळे अनेक अभिनेत्रींना चित्रपट सोडावा लागला' असा दावा या संस्थेने केला होता. यानंतर शमशुद्दीनने आपली प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी संबंधित संस्थेविरोधात 100 कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

    नवाझुद्दीनची कोणतीही प्रतिक्रिया नाही
    शमशुद्दीन सिद्दिकी 'बोले चुडीया' या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत. संबंधित प्रकाशन संस्थेने आपली प्रतिमा मलीन दाखवण्यात आली असल्याचे शमशुद्दीनने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. नवाझुद्दीनने मात्र या सर्व याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

    या महिन्यात प्रदर्शित होणार चित्रपट
    राजेश आणि किरण भाटीया या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. येणाऱ्या मे-जूनमध्ये 'बोल चुडियाचे' चित्रीकरण पूर्ण होणार आहे. ऑक्टोबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मौनी रॉयने 2016 मध्ये अक्षयकुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

Trending