आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंतेवाडात भाजप आमदाराच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, आमदारासह 5 जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दंतेवाडा - छत्तिसगडच्या नक्षलग्रस्त भागात भाजप आमदाराच्या ताफ्यावर मोठा नक्षली हल्ला झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना दंतेवाडात हा हल्ला झाला. यामध्ये भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्यासह सुरक्षा रक्षक आणि चालक यांच्यासह 5 पोलिस जवान शहीद झाले आहेत. आमदार मांडवी ताफ्यातील शेवटच्या वाहनात बसले होते. याच वाहनाला लक्ष्य करून सुरुवातीला आयईडी ब्लास्ट घडवण्यात आला. यानंतर नक्षलींनी वाहनांच्या ताफ्यावर बेछूट गोळीबार केला.

 

आमदार मांडवी प्रचारासाठी निघाले होते. त्याचवेळी नक्षलींनी त्यांच्या बुलेटप्रूफ वाहनाला आयईडीने लक्ष्य करून उद्ध्वस्त केले. यानंतर त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सुरुवातीला आमदार मांडवी बेपत्ता झाल्याचे सांगितले जात होते. परंतु, अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये आमदारांचे वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. या वाहनाच्या अवस्थेवरून स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. मांडवी यांच्यासह वाहनांच्या ताफ्यात पक्षाचे इतर नेते आणि सुरक्षा रक्षकांसह इतर जणांचाही समावेश होता. त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सीआरपीएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.