Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Naxal attack on election duty commando unit in gadchiroli, casualty reported

Naxal Attack: गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून कमांडो पथकावर हल्ला, 3 जवान जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 06:08 PM IST

निवडणुकीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पथकावर नक्षलींनी केला हल्ला

  • Naxal attack on election duty commando unit in gadchiroli, casualty reported

    गडचिरोली - गडचिरोलीत गुरुवारी नक्षलवाद्यांनी कमांडो पथकाला लक्ष्य करून हल्ला केला. ताफ्यात एकूणच 60 जवान होते. त्यातील 3 जण जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. हे सर्वच कमांडो अतिसंवेदनशील भागात सुरक्षेसाठी तैनात होते. नक्षलवाद्यांनी एटापल्ली येथील मतदान केंद्राला लक्ष्य करून दुपारी 3 वाजता स्फोट घडवला. नक्षलींनी मतदान झाल्यानंतर स्फोट घडवण्यासाठी आधीच आयईडी स्फोटके पेरली होती. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोर नक्षलींना यशस्वीरित्या तेथून हकलून लावले. तसेच किरकोळ जखमी जवानांवर प्रथमोपचार करण्यात आला आहे.

    निवडणुकीला विरोध करताना मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी लोकांना मतदान न करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी छत्तिसगडमध्ये देखील हल्ला करण्यात आला. यात प्रामुख्याने भाजपच्या आमदारांना लक्ष्य करण्यात आले. छत्तिसगडच्या हल्ल्यात आमदारासह इतर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सलग दोन दिवस महाराष्ट्रातील मतदान केंद्रांजवळ नक्षलवाद्यांनी स्फोट घडवले. मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी नक्षलवाद्यांनी सुरुवातीला आयईडी ब्लास्ट घडवला. परंतु, पुढील हल्ला करण्यापूर्वीच जवानांनी नक्षल्यांना पळवून लावले.

Trending