Home | Divya Marathi Special | naxal-commander-ravi-alias-ganeshu-surrender

नक्षलवादी माणसात आला

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क - भिलाई | Update - May 25, 2011, 12:07 PM IST

भिलाई - गेल्या सात वर्षांपासून नक्षली कारवायांमधे समावेश असलेल्या गणेशूने अखेर या चळवळीला रामराम केला आहे.

 • naxal-commander-ravi-alias-ganeshu-surrender

  भिलाई - गेल्या सात वर्षांपासून नक्षली कारवायांमधे समावेश असलेल्या गणेशूने अखेर या चळवळीला रामराम केला आहे. नवीन आयुष्य सुरू करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची इच्छा असल्याचे गणेशूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करताना सांगितले. गरिबी, अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात लढण्याचे आमिष दाखवून नक्षली नेते गरीब आणि गरजू लोकांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करतात. मात्र, नंतर नक्षली नेत्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मोठ्या प्रमाणावर विरोधाभास असल्याचे दिसून येते, अशी माहिती गणेशू याने पोलिसांना समर्पणानंतर बोलताना दिली.

  छत्तीसगडची वसुली जाते आंध्र प्रदेशात
  या लोकांच्या दलममध्ये दाखल झालेल्या एखाद्याला जर पुन्हा पूर्वीसारखे सामान्य आयुष्य जगण्याची इच्छा निर्माण झाली तर त्याला पोलिसांचे भय दाखवून त्यांच्याकडून अवैध कामे करवून घेतली जातात, असेही गणेशूने सांगितले. आंध्र प्रदेशचे नक्षली छत्तीसगडच्या लोकांचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतात. महिलांसोबतही अभद्र व्यवहार करतात. छत्तीसगडमधून जमा झालेली अवैध धंद्यातली संपूर्ण वसुली सिनिअर कॅडरद्वारा आंध्र प्रदेशात पाठवली जाते, अशी माहितीही गणेशूने दिली.

  नेत्यांकडूनच शोषण
  शोषण आणि अत्याचाराविरोधात लढण्याचे आश्वासन देणारे स्वत: खूप मोठ्या प्रमाणावर शोषण करत असल्याचेही गणेशू याने सांगितले. आपल्या आई-वडिलांची तब्येत ठीक नसताना त्यांना भेटायला जाण्यासही आपल्याला मनाई करण्यात आली, शिवाय कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करण्यात आली नाही. तेव्हाच या नक्षली चळवळींमधला फोलपणा आपल्या समोर आला आणि आपण समर्पण करण्याचे ठरवले, असे गणेशूने सांगितले.

  ह्या कारणाने बनला गणेशू नक्षली
  नक्षली नेते गरिबी अन्याय, अत्याचार आणि शोषण दूर करण्यासंबंधीची जोशपूर्ण भाषणे करत असतात. अशा भाषणांच्या भूलथापांना बळी पडूनच लोक नक्षली चळवळीत येतात. आपणसुद्धा अशाच प्रकारचे चिथावणारे भाषण एेकून या चळवळीकडे आकर्षित झाल्याचे गणेशूने सांगितले.

  गणेशूचा सदस्य ते कमांडरपर्यंतचा प्रवास
  २४ मध्ये ३२ वर्षीय गणेशूचा शहीद सप्ताहाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या नक्षली चळवळींशी संबंध आला. सुरुवातीला त्याला जोब दलमचा सदस्य करण्यात आले, इथून पुढे मग नंतर त्याला वेगवेगûया दलमचा सदस्य म्हणून नेमण्यात आले. २११ मघे टांडा दलमच्या कमांडरपदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती.

  सर्व सोयी देऊ - आर. के. विज
  गणेशूने आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारतर्फे ज्या ज्या योजना, सोयी-सुविधा देणे शक्य आहे, त्या सर्व गणेशूलाही पुरवण्यात येतील, अशी माहिती पोलिस महासंचालक आर. के. विज यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Trending