आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxalite Attack In Bihar News In Marathi, Lok Sabha Election

बिहारमध्ये नक्षलवाद्यांच्या भू-सुरुंगस्फोटात CRPF चे 2 जवान शहीद, 7 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंगेर-भागलपूर-पाटणा- लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी मुंगेर येथील हवेली खडगपूर परिसरात केलेल्या भू-सुरुंगस्फोटात सीआपपीएफचे दोन जवान शहीद झाले तर सात जखमी झाले आहेत.
भीम बांध जंगलात असलेल्या हवेली खडगपूर परिसरात नक्षलवाद्यांनी भू-सुरुंग लावला होता. यादरम्यान सीआरपीएफचे जवान जमुई मतदारसंघात निवडणूक कामावर जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर बेछुट गोळीबार सुरू केला. यात दोन जवान शहीद झाले तर सात जखमी झाले. जखमी जवानांना प्रथम भागलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर योग्य उपचारांसाठी त्यांना पाटणा येथे हलविण्यात आले.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले रविंद्रकुमार राय मुळचे बिहारचे तर सोने गौरेय कर्नाटकचे आहेत. विश्वनाथकुमार, राम पाल, धर्मात्मासिंह, धर्मपालसिंह, राघवेंद्रकुमार, अशोक बेसरा आणि विक्रमसिंह या घटनेत गंभीर झाले असून ते उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.
दुसरीकडे लखीसरायमधील कजरा परिसरात नक्षलवाद्यांनी स्कूल भवनावर हल्ला केला. परंतु, यावेळी स्कूल भवनात कुणीच नव्हते. येथील जवान जमुई मतदारसंघातील निवडणूक कामावर गेले होते. येथे काही बॉम्बही सापडले आहेत. त्यामुळे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पाठविण्यात आले आहे.
जमुई परिसरात दोन जिवंत भू-सुरुंगही सापडले आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे 12 मतदान केंद्रातील मतदान थांबविण्यात आले आहे. यातील पाच भेलवा घाटी, पाच खैरा आणि दोन नरगंजो जुरपनिया येथील आहेत.
अधिक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...