आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxalite Attack On CRPF Persons In Chhattisgarh News In Marathi

छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 14 ठार, बघा EXCLUSIVE फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांंमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या दोन भीषण हल्ल्यात सात निवडणूक कर्मचारी, 'सीआरपीएफ'चे सहा जवान, एक चालक आणि एक आरोग्य कर्मचारी मृत्युमुखी पडले असून बारा जवान जखमी झाले आहेत. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ले केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जात असलेल्या 'सीआरपीएफ'च्या जवानांची बस नक्षलवाद्यांनी उडवून दिली. त्यानंतर बेछुट गोळीबार केला. यात सात निवडणूक कर्मचारी ठार झाले.
सुकमा जिल्ह्यातील झिरम घाटीजवळ असलेल्या तिरथगड परिसरात जवानांना घेऊन जाणारी अॅम्बुलन्स भू-सुरुंगस्फोटात नक्षलवाद्यांनी उडवून दिली. या घटनेत सहा जवानांसह, एक चालक आणि एक आरोग्य कर्मचारी ठार झाले. अॅम्बुलन्सवर हल्ला केल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांची शस्त्रे पळवून नेली. रोड ओपनिंगसाठी हे जवान गेले होते. काम पूर्ण झाल्यावर घरी लवकर परत येण्यासाठी जवान एका अॅम्बुलन्समध्ये बसले. नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगाच्या मदतीने ही अॅम्बुलन्स उडवून लावली. अॅम्बुलन्समध्ये बसणेच जवानांच्या जिवावर बेतले.
बिजापूर जिल्ह्यात 10 एप्रिल रोजी मतदान झाले. हा संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त आहे. तरीही येथे चांगले मतदान झाले आहे. नक्षलवाद्यांची दहशत असल्याने मतदान झाल्यानंतरही निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुमारे 200 टीम 'सीआरपीएफ' जवानांच्या कॅम्पवर अडकून पडल्या आहेत. त्यामुळे आज त्यांना निवडणूक मुख्यालयात नेण्यात येत होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी 'सीआरपीएफ' जवानांची बस भू-सुरुंगाने उडवून लावल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
निवडणूक कर्मचाऱ्यांना बसमधून नेणे पडले महाग... बघा पुढील स्लाईडवर
(छायाचित्रात नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगात उडवलेली अॅम्बुलन्स)