National / बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी समाजवादी पार्टीच्या नेत्याचे केले अपहरण, नंतर हत्या करून मृतदेह फेकला रस्त्यावर


9 एप्रिलला बस्तरचे एकमात्र भाजप आमदार भीमा मंडावी यांची नक्षवाद्यांनी हत्या केली होती

दिव्य मराठी वेब

Jun 19,2019 02:25:00 PM IST

बिजापूर(छत्तीसगड)- येथील समाजवादी पार्टीचने नेते संतोष पुनेमा यांचे नक्षलवाद्यांनी घरातून अपहरण केले. नंतर हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकून पसार झाले. घटना मंगळवारी रात्री घडली. संतोष मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिजापूरवरून निवडणूक लढले होते, त्यात त्यांचा पराभव झाला होता. असे सांगितले जात आहे की, या परिसरात होणारे रस्ते आणि इतर विकास कामांमुले ते नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते.


पोलिसांच्या हाती लागले नाही मृतदेह
बिजापूर एस.पी. दिव्यांग पटेल यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी संतोष आपले गाव मरिमल्लाला गेले होते. संध्याकाळी हत्त्यारे घेऊन नवक्षलवादी त्यांच्या घरात घुसले आणि त्यांचे अपहरण केले. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून पळून गेले. पण आतापर्यंत कुटुंबीय आणि पोलिसांना त्यांच्या मृतदेह मिळाला नाहीये, कारण ज्या परिसरात त्यांच्या मृतदेह आहे, तो मोठा जंगलाचा परिसर नक्षलवाद्यांचा आहे.


लोकसभा निवडणुकीच्या आधी झाली होती मंडावींची हत्या
लोकसभा निवडणुकीच्या आधी 9 एप्रिलला बस्तरचे एकमात्र भाजप आमदार भीमा मंडावी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. श्यामागिरीमध्ये आयईडी विस्फोट करून मंडावींच्या ताफ्याला उडवण्यात आले होते. यात मंडावी यांच्यासोबत 4 पोलिस कर्मचारीही शहीद झाले होते.

X
COMMENT