आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या बर्थडेसाठी घरी आला होता जवान, ते पोलिसाच्या वेशात आले, आणि एके 47 ने केली चाळणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमुई (बिहार) - नक्षल्यांनी एसएसबी जवानाची गोळी मारून हत्या केली. मृत जवान सिकंदर यादव तीन दिवसांसाठी सुटीवर घरी आले होते. ते मधुबनीच्या जयनगरमध्ये एसएसबीच्या 48व्या बटालियनमध्ये तैनात होते.

 

सिकंदर सोमवारी सायंकाळी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाची तयारी करत होते. त्याचवेळी पोलिसांच्या वेशात सहा नक्षली तेथे आले. त्यांनी एसएसबी जवान सिकंदरला कमांडो म्हणत बोलावले. तसेच सोबत पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. जवान रस्त्यावर येतात आधीच लपलेल्या इतर नक्षल्यांनी त्यांना पकडले आणि त्यांचे हात बांधले. त्यानंतर नक्षली त्यांना घेऊन कुकुरझप डॅमच्या रस्त्याकडे निघाले. जवानाचे वडील सिकंदरला सोडण्यासाठी विनवण्या करू लागले तर त्यांनी त्यांना मारहाण केली आणि एके-47 ने सिकंदर यांच्या शरिराची चाळणी केली. त्यानंतर ते सर्व गुरमाहा जंगलाकडे निघून गेले. घटनेच्या दोन तासांनी स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफचे जवान पोहोचले. परिसरात घटनेनंतर दहशतीचे वातावरण आहे. 


महिलाही आल्या पोलिसांच्या वेशात 
मृत जवानाच्या वडिलांनी सांगितले की, जवळपास 15 नक्षल्यांनी त्यांच्या मुलाची हत्या केली. त्यात पाच महिला होत्या असेही ते म्हणाले. सर्वांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. हेरगिरी केल्याचा आरोप करत या जवानाची हत्या करण्यात आली आहे. पण गावकऱ्यांनी मात्र हा जवान फार कमी काळासाठी सुटीवर यायचा असे सांगितले. 


हौतातम्य वाया जाणार नाही-आयजी 
पोलिस महानिरीक्षक म्हणाले की, नक्षल्यांनी नैराश्यात हा भ्याड हल्ला केला आहे. नक्षली चळवळ संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे होणाऱ्या अस्वस्थतेमुळे ही घटना घडवली असल्याचेही ते म्हणाले. या घटनेला उत्तर द्यायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 


गावकऱ्यांसाठी पुरी भाजीची पंगत 
सिकंदर मोठ्या उत्साहात मुलीच्या वाढदिवसाची तयारी करत होते. त्यांनी शहरातून केक, मिठाईसह गावकऱ्यांसाठी पुरी भाजी मागवली होती. गावकऱ्यांना ते पंगत देणार होते. मुलगी खुशी केक कापणार त्याच्या आधीच ही घटना घडली. मंगळवारी सकाळपर्यंत खुशी फुगे हाती घेऊन वडील परत येण्याची वाट पाहत होती. 

 

बातम्या आणखी आहेत...