आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवादी तयार करणार प्रशिक्षित तज्ञांची भरती, स्निपरची भरती करण्यावर देणार विशेष भर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - २ ते ८ डिसेंबर या कालावधीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीचा (पीएलजीए) १९ वा वर्धापन दिन माओवादी साजरा करत आहेत. हे पाहता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर बंदी घातलेल्या पीएलजीएने नक्षल गटांना मजबूत करण्यासाठी तरुणांची भरती करण्यासोबतच तज्ञांची भरती करण्यावर भर दिल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. विशेषत: ‘स्निपर प्रशिक्षण’ म्हणजे लपलेल्या ठिकाणाहून दूरवरील सैनिकांवर गोळीबार करणारा बंदूकधारी सैनिक प्रशिक्षणावर भर देण्यास सांगितल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

२ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पीएलजीएच्या स्थापना दिवसाला हिंसक वळण लागले आहे. झाडे आडवी टाकून रस्ता अडवणे, पोलिस खबऱ्यांना ठार मारणे, बांधकाम साहित्य जाळणे असे प्रकार नक्षली करतात. तत्पूर्वी पोलिसांनीही खबरदारीचे उपाय योजले आहेत. सहा नक्षल्यांनी आत्मसमर्पणही केले. नागरिकांनी नक्षल्यांचे बॅनर जाळून भीती झुगारून दिली. यामुळे कमी होत जाणारी दहशत वाढवण्यासाठी नक्षल्यांनी तरुणांच्या भरतीसोबतच थेट प्रशिक्षित व्यावसायिकांना भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलाने बऱ्याच माओवाद्यांचा खात्मा केल्यामुळे सीपीआयने (माओवादी) धोरणात्मक बाबींचा पुनर्विचार करण्याचे ठरवले आहे.

या कागदपत्रांनुसार डाव्या विंगच्या अतिरेकी संघटनेने आपल्या गटांना ‘बळकट’ करण्यास सांगितले आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाकप-माओवाद्यांनी तरुणांना पीएलजीएमध्ये भरती करण्याची तसेच शहरी भागात सदस्यता अभियान राबवण्याची सूचना केली आहे.  मोठ्या वनक्षेेत्रात कार्यरत सैनिक किंवा सेनापती भरतीव्यतिरिक्त राजकीय समिती, विचारवंत, शिक्षक, डॉक्टर, संप्रेषण करणारी व्यक्ती, सुतार, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर्स, संगणक ऑपरेटर, दारुगोळातज्ञ इत्यादींची भरती केली जावी, असे नमूद केले आहे.विविध क्षेत्रांत नेटवर्कची उभारणी


माओवादी सीएमसीने विधी, राजकीय, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात ‘पार्टी नेटवर्क’ वाढवण्यावर भर दिला आहे. यात ‘शहरी, मैदानी भाग आणि वन क्षेत्रात’ आंदोलने सुरू करण्यासाठी सांगितले आहे. आंदोलनांना स्थानिक लोकांचा प्रतिसाद मिळत असेल तेथे ‘व्यावसायिक क्रांतिकारक’ आणि ‘संयोजक’ यांना नवीन ‘संघर्ष क्षेत्रे’ विकसित करण्यासाठी पाठवावे. तसेच आंदोलनांच्या ‘पुरोगामी शक्तींमधून’ व्यावसायिक क्रांतिकारक तयार केले जावेत. शहरी भागात आणि मैदानावर, उपक्रम केवळ प्रसिद्धी आणि आंदोलनापुरते मर्यादित न राहता ‘नव्या ताकदीने अत्यंत छुप्या पद्धतीने पार्टी तयार करणे.’ त्यानंतर यामधून नवीन पक्ष समित्या तयार केल्या पाहिजेत, असे कागदपत्रात नमूद केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...