आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

92 व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात गोंधळ, महिलांनी चेहर्‍यावर लावला नयनतारा सेहगल यांचा मास्क

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे. मात्र, संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात काही महिलांनी नयनतारा सेहगल यांचा मास्क लावल्याने गोंधळ उडाला. उद्घाटनाच्या वेळी सेहगल यांचे भाषण वाचले जावे, अशी मागणीही अनेकांकडून करण्यात आली. मात्र, या मागणीला महामंडळाने स्पष्ट नकार दिला आहे. आयोजकांनी या महिलांना समज देऊ सेहगल मास्क काढायला लावले.

 

नयनतारा सेहगलांच्या अनुपस्थितीचा निषेध म्हणून रत्नागिरीहून आलेल्या काही महिलांनी आपल्या चेहर्‍यावर सेहगल यांचा मास्क लावला होता. सेहगल यांचे उद्‍घाटक म्हणून आमंत्रण रद्द केल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.

    
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 4 वाजता उद्घाटन झाले. रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करण्यात आले. संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर (ता.कळंब) येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...