आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनबीएफसी संकट आमच्यासाठी संधी, कर्ज भागीदारी वाढवणार : स्टेट बँक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदाता भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) आयएल अँड एफएस संकटात संधी दिसत आहे. एसबीआय छोटे व्यापारी आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कर्जात वाढ करण्याची शक्यता आहे. बँकेचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी हे संकेत दिले. एस्सार स्टीलसारख्या मोठ्या कॉर्पोरेटने कर्ज थकवल्याने एसबीआयला मोठी तरतूद करावी लागली होती. मात्र, आता बँक यातून बाहेर पडत आहे. बँकेतर वीत्त पुरवठा कंपन्यांच्या वतीने कर्ज मिळत असलेल्या क्षेत्राला आता एसबीआयच्या वतीने कर्ज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आयएल अँड एफएस आणि इतर एनबीएफसींचा समावेश होता. बँक आपल्या नियमांचे पूर्णपणे पालन करून सर्व व्यापाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या क्षेत्रात अनेक संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.


चालू वर्षात कर्जवाढीचे बँकेने ठेवले ११ टक्क्यांच उद्दिष्ट 
एसबीआय प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. बँक जास्त नफ्यात असून छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देण्याच्या स्थितीत आहे. या क्षेत्रात आतापर्यंत बँकेतर कंंपन्यांच कर्ज देत होत्या. एसबीआयला मार्च २०२० पर्यंत ११%चा विकास दर मिळवायचा आहे. यात या कर्जाचा फायदा होईल. मात्र, यातही सतर्क राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


१० वर्षांत शॅडो बँकिंग कंपन्यांची भागीदारी तेजीने वाढली
मागील दशकात देशात बँकेतर बँकिंग कंपन्या कर्ज देण्यात पुढे राहिल्या आहेत. त्यांना शॅडो बँक म्हटले जाते. त्यांच्यामुळे कर्जाच्या बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची भागीदारी कमी झाली आहे. मात्र, वर्षभरात स्थिती बदलली आहे. आयएलअँडएफएस संकटानंतर  बँकेतर वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या (एनबीएफसी) सतत होत असलेल्या डिफॉल्टमुळे त्रस्त झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...