आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ईडीच्या कार्यालयावर राष्ट्रवादीची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धरपकड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 70 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. शरद पवारांविरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. 
 
शिखर बँक घोटाळ्यात कुठेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध नसताना त्यांचे नाव घेतले आहे. 52 वर्ष संसदीय राजकारणात असलेल्या पवार साहेबांनी कधीही सूडबुद्धीने राजकारण केले नाही. आज वयाच्या 80 व्या वर्षी ते अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत आहे. विरोधकांना त्यांची आता भीती वाटत आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना शिखर बँक घोटाळ्यात गोवले जात असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.