आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोद महाजनांच्या हत्येचे अंतर्गत कांगोरे मला माहिती.. खबरदार पवारांना बोलाल तर, जितेंद्र आव्हाड यांचा पूनम महाजन यांना इशारा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शरद पवार यांचा शकुनी मामा म्हणून उल्लेख केल्यानंतर पूनम महाजन यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तर पूनम महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. या वक्तव्यानंतर पूनम महाजनविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पोस्टर लावले तर जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ द्वारे पूनम महाजन यांना खबरदारीचा इशाराच दिला आहे. 


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोस्टर्स..
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध करत मुंबईत विविध ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. यानवर पूनम महाजन यांचा चिऊताई असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यावर महाभारत-रामायण राहू द्या.. देश की जनता ये जानना चाहती है की, प्रवीणने प्रमोदको क्यो मारा?  असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. 


जितेंद्र आव्हाडांचा इशारा..
राष्ट्रवादी काँग्रेसने नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पूनम महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांना इशारा देताना आव्हाड म्हणाले..

पूनमताई महाजन... स्व. प्रमोद महाजन आणि श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मैत्रीचे संबध आपण कसे काय विसरलात ? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो. आपल्या वडीलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार... सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही.

Video तून पाहा काय म्हणाले आव्हाड.. 

पूनम महाजन ताई जरा सांभाळून बोला
सभ्यतेच्या मर्यादा आम्हाला ओलांडू लावू नका pic.twitter.com/iYlLcBXDgd

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2019

बातम्या आणखी आहेत...