आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ परभणीत सायकल मोर्चा, राष्ट्रवादीच्या 3 आमदारांनी चालवली सायकल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राष्‍ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे व आमदार डॉ. मधूसुदन केंद्रे यांनी राष्ट्रवादी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकलस्वारी केली.  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह राष्‍ट्रवादीच्‍या अनेक पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

राष्ट्रवादी भवनापासून बारा वाजता शेकडो कार्यकर्ते व पदाधिका-यांनी सायकलवर स्वार होवून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मोर्चासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सायकली आणल्या होत्या. केंद्र शासनाचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोलचे सर्वांधीक दर परभणीत असल्याने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी यांनी दिला.


दिवसेंदिवस पेट्रोल दरवाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलचे सर्वाधीक दर परभणीतच आहेत. या माध्यमातून सरकारने जनतेची सर्रास लुट चालवली आहे. 40 रुपयांच्या पेट्रोलवर 125 पट कर लावून सुमारे 87 रुपयांनी पेट्रोलची विक्री केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना देशोधडीला लावणा-या सरकारचा निषेध नोंदवून आता सायकल चालविण्याची वेळ सरकारने आणली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी केला.

बातम्या आणखी आहेत...