आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार माढ्यातून लढणार नाहीत..मोहिते पाटलांच्या समर्थकांकडून विरोध, पार्थ यांच्या उमेदवारीने \'घराणेशाही\'चा ठपका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहीते पाटील हेच माढ्यातून निवडणूक लढविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पवारांना देशभर प्रचार करायचा असल्याने निवडणूक न लढविण्याचे केंद्रीय समितीने सुचविले आहे.

 

माढा लोकसभा लढवावी की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी पवारांनी पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा केली. विजयसिंह मोहिते पाटील यांनीच माढ्यातून निवडणूक ल‍ढवावी, असा आग्रह खुद्द पवारांनी केल्याचे समजते. त्यानंतर पवारांनी माढ्यातून लोकसभा लढविणार नसल्याचे जाहीर केले.

 

शरद पवारांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. परंतु शरद पवार यांच्या उमेदवारीला माढ्यातून जोरदार विरोध होत आहे. स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी थेट पवारांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

 

पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा ठपका..

अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवारांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा ठपका ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...