आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची केली प्रशंसा तर पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भरभरुन प्रशंसा केली. इंदिरा गांध आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही सोनिया गांधी आणि राहुल गांधी गरीब जनतेची सेवा करत आहे. दरम्या, शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून स्वत:चा राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.

 

पवार म्हणाले, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी ब्रिटिश शासन काळात अनेक वर्षे तुरुंगात घालविले होते. इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर नेहरुंनी सामन्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी काम केले. गांधी कुटुंबातील सदस्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. इंदिरा आणि राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देशसेवेचे व्रत सुरुच ठेवले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधी कुटुंबावर कायम टीका करतात. एका कुटुंबाने संपूर्ण देश उद्धवस्त केल्याचे मोदी म्हणतात.

 

सातारा येथे आयोजित एका सभेत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत निष्पाप लोक मारले जात होते, तेव्हा मोदी काहीच करु शकले नाही. मोदींनी गुजरात राज्य दंगलखोरांच्या हवाले केले होते.

 

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणातील 22  आरोपींना निर्दोष सुटका करण्यात आली. त्यावर पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील चार वर्षे सत्तेत राहून भापजला कधी राममंद‍िर आठवले नाही. या चार वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देशातील जनतेची दिशाभूल केली आहे.  मात्र, अाता देशातील वातावरण बदलत आहे. मागील निवडणुकीत मतदातारांनी भाजपला संधी दिली होती. परंतु आता मात्र, मतदारांना कळून चुकले आहे की, राम मंदिराच्या नावाने भाजप राजकारण करत आहे.

 

राज्यात भाजप सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेले आहे ते कोर्टात किती टिकेल? याबाबत  शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...