आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडणुकीत महाशिवआघाडी दिसणार नाही, पुण्यात आघाडीने जाहीर केला उमेदवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यात सत्ता स्थापनेसाठी आघाडी आणि शिवसेनेच्या महाशिवआघाडीची चर्चा सुरू असताना महापौर पदासाठी असे समिकरण दिसणार नाही. पुण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित उमेदवार देतील अशी चर्चा होती. परंतु, या पदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपल्या आघाडीचाच उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून संयुक्तरित्या प्रकाश कदम यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, भाजपने महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा केली आहे.

पुण्यात महापौर पद एका वर्षांसाठी राहणार आहे. महापौर पदासाठी भाजपने मोहोळ यांच्या नावाची घोषणा केली. तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेडगे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. येत्या 22 नोव्हेंबर रोजी महापौर पदासाठी निवडणूक होत आहे. तसेच भाजप आणि आघाडीचे उमेदवार लवकरच आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीने विधानसभा एकत्रित लढवली. निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत देखील मिळाले. परंतु, मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर दोघांची युती तुटली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाशिवआघाडीच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, ही महाशिवआघाडी महापौर निवडणुकीत दिसून आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...